ETV Bharat / entertainment

गंभीर जखमी असताना अनीस बज्मींनी पूर्ण केलं 'भूल भुलैया 3'चं शूटिंग - BHOOL BHULAIYA 3

'भूल भुलैया 3' च्या शूटिंगपूर्वी दिग्दर्शक अनीस बज्मी यांना पायाला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेतच त्यांनी याचं काम पूर्ण केल्याचं सांगितलंय.

Anees Bazmee
'भूल भुलैया 3'चं शूटिंग (Photo ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 7, 2024, 5:39 PM IST

मुंबई - 'भूल भुलैया 3' चे निर्माता आणि दिग्दर्शक अनीस बज्मी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे. अनेक अडथळे पार करत त्यांनी या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली असून ठरल्या प्रमाणे यंदाच्या दिवळीला हा सिनेमा प्रदर्शित करण्यात त्यांना यश मिळत आहे. यावर्षी या 'भूल भुलैया 3' ची बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' या मल्टीस्टारर चित्रपटाशी स्पर्धा होणार आहे.

खरंतर अनीस बज्मी यांनी 'भूल भुलैया 3' हा चित्रपट एका पायावर बसून तयार केला आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याच्या आठवडाभर आधी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यानंतर डॉक्टरांनी 4 ते 6 महिने विश्रांतीचा सल्ला देऊनही, बज्मी यांनी आपला चित्रपट निर्मितीचा हट्ट सोडला नाही. दिवाळीला चित्रपट रिलीज करायचाच हा निर्धार करुनच ते शूटिंगच्या तयारीला लागले होते. "जर मी शूटिंगला उशीर केला असता तर आमची तारीख चुकली असती," असं अनीस बज्मी यांच्या टीमनं शेअर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

अनीस बज्मी यांना विश्वास होता की घरी बसलो तरी पायाची दुखापत काही पूर्ण बरी होणार नाही, त्यापेक्षा काम करत राहण्याचा पर्याय त्यांनी निवडला. "मला असंही वाटलं की जर घरी राहिलो तरीही मी काही लवकर बरे होणार नाही. शूटिंग सुरू करण्याच्या माझ्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. मला खूप वेदना होत होत्या, पण आम्ही दुर्लक्ष केलं आणि मी माझ्या खुर्चीत बसून अर्ध्याहून अधिक चित्रपट पूर्ण केलं.," असं त्यांनी पुढं म्हटलंय.

त्याअगोदर एएनआयशी झालेल्या चर्चेच्यावेळी त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं आणि विद्या बालनबरोबरचा काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. त्यानं शेअर केले की, "ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. या चित्रपटात तिनं खूप मेहनत घेतली आहे. मला ती प्रत्येक चित्रपटात आवडते. पण या चित्रपटात तिने इतके सुंदर काम केलं आहे की मी तिचा चाहता झालो आहे. तिच्याबरोबर काम करण्याचा हा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही आणि शेवटच्या दिवशी आम्ही खूप मजा केली होती..."

अनीस बज्मी यांनी 'भूल भुलैया 2' आणि 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यनला दाखवण्याचा विचार का केला हे देखील सांगितले. "मी याआधी कार्तिकबरोबर चित्रपट तयार करायचं ठरवलं होतं, पण काही कारणानं घडू शकलं नव्हतं. यानंतर मी जेव्हा 'भूल भुलैया 3'ची स्क्रिप्ट वाचली आणि निर्मात्यांनी सांगितले की आम्ही कार्तिकचा विचार करत आहोत, तेव्हा मला खूप आनंद झाला. तो या व्यक्तिरेखेला अगदी चपखल बसतो."

कार्तिकच्या कामाचं कौतुक करताना दिग्दर्शक अनीस बज्मी म्हणाला, "जर तुम्ही त्याला दुसऱ्या भागात पाहिलं असेल, तर तुम्हाला नक्कीच या भागात त्याचं काम अधिक आवडेल. त्यानं अप्रतिम काम केलं आहे."

चित्रपटाबद्दल बोलताना अनीस बज्मी यांनी शुक्रवारी 'भूल भुलैया 3' साठी अपेक्षित असलेल्या टीझरचे लॉन्चिंग केलं होतं. आज 'सिंघम अगेन'चा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर 'भूल भुलैया 3' चा ट्रेलर कधी लॉन्च होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा ट्रेलर पाहता येऊ शकेल. या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहेय

अनावरण केले, ज्यामध्ये विद्या बालनचे प्रतिष्ठित पात्र मंजुलिका म्हणून पुनरागमन झाले आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या मूळ चित्रपटात विद्यानं संस्मरणीय भूमिका साकारल्यानंतर आता या चित्रपटाच्या फ्रँचाइजमध्ये ती पुनरागमन करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.