सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सामुदायिक प्रतिबद्धतेची भूमिका अत्यंत कळीची ठरते. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये, सरकार आणि आरोग्य व्यवस्थेचा विविध समुदाय, रुग्ण, त्यांचे कुटूंबीय आणि इतर अनेक प्रकारचे निगडित लोक, भागीदार आणि क्षेत्रांशी संबंध येतो, हे ध्यानी घेणे आवश्यक आहे. इबोला व्हायरस आणि निपाह व्हायरस या सार्वजनिक आरोग्यासाठी नुकत्याच आव्हानात्मक ठरलेल्या दोन झोनोटिक संसर्गजन्य आजारांवर उपाययोजनांसाठी सामुदायिक प्रतिबद्धतेचा पर्याय प्रभावी ठरला आहे. आफ़्रिका खंडामधील कोंगो देशाच्या ईशान्य भागामध्ये २०१८ पसरलेल्या इबोलास सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनामधून जुलै २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणीबाणी जाहीर करण्यात आले. निपाह व्हायरसचा उद्रेक २०१८ मध्ये केरळमध्ये पहावयास मिळाला आणि त्यास दक्षिण-पूर्व आशिया भागामधील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनामधून महत्त्वपूर्ण असलेला उदयोन्मुख झोनोटिक आजार म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आले.
सामुदायिक प्रतिबद्धता म्हणजे काय?
”आरोग्याशी संबंधित आव्हानांवर उपाययोजना करण्यार्थ एकत्रित काम करण्यासाठी संबंधितांना भागीदारीचा विकास आणि सकारात्मक आरोग्य परिणाम आणि निकाल साध्य करण्यासाठी उत्तेजन देणारी प्रक्रिया” अशी सामुदायिक प्रतिबद्धतेची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे.
येथे समुदायाच्या व्याख्येमध्ये संबंधित समुदायासहित शिक्षण, सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांमध्ये कार्यरत व्यक्ती, योजनाकर्ते आणि संस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. लोकांच्या पर्यावरणीय आणि सामाजिक संदर्भांनी आरोग्य आणि आजारांच्या संकल्पनांना आकार दिलेला असतो, या तत्त्वावर सामदायिक प्रतिबद्धतेच्या तर्काची पायाभरणी करण्यात आली आहे.
सामुदायिक प्रतिबद्धतेच्या अंमलबजावणीशी निगडित असणारे काही प्रस्थापित दृष्टिकोन आणि योजनांमध्ये सामाजिक एकत्रीकरण, संप्रेषण (सुरुवात (आऊटब्रेक), आव्हान, धोका) आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमामधून आरोग्यासंदर्भातील प्रसाराचा समावेश होतो.
याचा फायदा कसा होतो?
सामाजिक गतिमानता (मोबिलायझेशन) - एकमेकांशी निगडित वा एकमेकांस पूरक निगडित असलेल्या विविध स्तरांच्या माध्यमामधून बदल घडवून आणणे हे सामाजिक गतिमानतेचे उद्दिष्ट असते. शासन व्यवस्थेस नवीन संसाधने मिळविणे (कोविड -१९ साठी मदत निधी उभारणे), मदतगारांचे सुदृढीकरण (परीक्षण, तपासणी, औषध निर्मितीसाठी तांत्रिक सहाय्य, माध्यमांमधील जागृती अशा विविध पातळ्यांवर खासगी क्षेत्र देत असलेले योगदान) यांमध्ये यश येत असल्याचे आपण पाहिले आहे.
याचबरोबर, कोविड - १९ महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरु असलेल्या या प्रयत्नांमध्ये स्थानिक समुदायांना सहभागी करुन घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानिक सामुदायिक नेत्यांचा परिचय आणि पद्धतशीरपणे त्यांना यामध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. वर्तणुकीतील बदल आणि समुदायांना शिक्षित करण्यासाठी महिलांना या प्रक्रियेत सहभागी करून घेणेही अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील अशा आणीबाणीवर उपाय करण्यासाठी समाजाचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ व त्याचे विश्लेषण साथींच्या रोगांच्या परीक्षणास पूरक ठरेल, अशा पद्धतीने करणे निकडीचे आहे. विविध समुदायांबरोबर या समुदायांच्या संस्कृती, ज्ञान आणि अनुभवांवर आधारलेल्या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे.
केरळमध्ये, निपाहच्या संकटाचा त्यांनी यशस्वीरीत्या सामना केला आणि त्यामध्ये सामाजिक गतिमानतेचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. उदाहरणार्थ, गावांमध्ये प्रस्थापित पंचायत व्यवस्था, शहरी स्थानिक संस्थांनी संपर्क ट्रॅकिंग आणि कुटुंबांना मदत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. स्वयंसेवी संस्था, महत्त्वपूर्ण नेते, धार्मिक नेते या सर्वांनीही सरकारच्या प्रयत्नांना बहुमोल साथ दिली. कोविड -१९ च्या आव्हानास आत्मविश्वासाने सामोरे जाण्याकरिता संसर्गजन्य आजारांवर उपाययोजना करताना अंमलात आणलेल्या या ’केरळ मॉडेल’चा त्यांना फायदा झाला आहे. कोविड-१९ च्या आव्हानवर उपाययोजना करण्यासाठी अनेक राज्यांकडून केरळ मॉडेलचा अंगीकार करण्यात येत आहे.
संप्रेषण - आजाराची साथ (आऊटब्रेक) आणि धोक्यांसंदर्भात परिणामकारक संप्रेषण होणे ही कोविड - १९ सारख्या महामारीसारख्या आजारांवर उपाययोजना करण्यासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सांस्कृतिकदृष्ट्या सुयोग्य संदेशांच्या माध्यमामधून धोक्याची तीव्रता कमी केली जाऊ शकते आणि बाधित व्यक्तीस , कुटुंबे तसेच समाजांस या धोक्याचा सामना करण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते. साथीच्या रोगाचा प्रसार होत असताना आजाराची नेमकी बदलणारी परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी संदेश सतत अद्यतनित होणे आवश्यक आहे.
परिणामकारक संप्रेषण योजनेसाठी समुदायांच्या सांस्कृतिक धारणा, संकेत, मूल्ये, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, इतिहास आणि भूतकाळातील अनुभवांच्या संदर्भांस जुळणारे संदेश तयार करणे अत्यावश्यक आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांशिवाय, सध्या अनेक लोक आभासी समुदायांची निर्मिती करत आहेत आणि माहिती मिळविण्यासाठी सोशल मिडियावर अवलंबून निर्णय घेत आहेत. अशा वेळी सोशल मिडियामधून चुकीच्या माहितीचा प्रसार होणेही शक्य असते. त्यामुळेच साथीच्या रोगांचा सामना करण्यार्थ योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी या आभासी समुदायांनाही भागीदार म्हणून स्थान देणे गरजेचे आहे.
आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुयोग्य सामाजिक प्रतिसादाच्या निर्मितीसाठी माहितीची पारदर्शकता राखली जावयास हवी. निपाह विषाणुच्या संकटावरील उपाययोजनेसाठी केरळकडून मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मिडिया या दोन्ही माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. अफवा आणि चुकीची माहितीचे खंडण विश्वासार्ह आणि नियमित माहितीच्या आधारे व्हावे, अशी खात्री त्यांनी बाळगली.
आरोग्य शिक्षणामधून आरोग्याचा प्रसार - आरोग्याचा प्रसार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या तत्त्वांवर व्हावयास हवा. परिणामकारक सामुदायिक सहभाग, क्षमता बांधणी, सामाजिक गतिमानता आणि संप्रेषणात्मक योजनांचा समावेश असलेल्या अशा दृष्टिकोनास राजकीय इच्छाशक्ती आणि कार्यतत्परतेची जोड मिळणे आवश्यक आहे. भविष्यात आरोग्य सुधारण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यास यामुळे लोकांना मदत होईल.
सामुदायिक प्रतिबद्धतेचे फायदे - सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये समुदायांच सहभाग आणि त्यांच्यासमवेत कम करणे अत्यावश्यक आहे. कोविड - १९ सारख्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आणीबाणीसदृश संकटांवर उपाययोजना करण्यार्थ समुदायाची तयारी करण्यासाठी सामुदायिक प्रतिबद्धता मोठी भूमिका बजावू शकते.
कोविड-१९ सारख्या साथीच्या आजारांच्या काळात अंमलात आणलेल्या सामुदायिक प्रतिबद्धतेचे काही दृश्य फायदे असे आहेत -
१. या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांसंदर्भात विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी याच्या माध्यमामधून मिळते
२. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील सामुदायिक विश्वास यामधून वाढतो
३. बाधा झालेले रुग्ण आणि आरोग्यसेवेमधील व्यावसायिकांविषयीच्या नकारात्मक भावनेवर उपाययोजना या माध्यमामधून करता येते
४. समाजामध्ये असलेली भीती आणि चुकीच्या माहितीमुळे निर्माण झालेली अनिच्छा दूर होते
५. शारिरीक अंतर आणि हस्त स्वच्छता यांसारख्या सामाजिक आणि वर्तणुकीसंदर्भातील उपाययोजनांस अधिक पूरक वातावरण निर्माण होते.
- नंद किशोर कन्नुरी, पीएचडी. (एडिशनल प्रोफेसर, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ, हैदराबाद)
(लेखात व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक आहेत).