बंगळुरू - १३.६२ सेंकंदामध्ये १४२.५ मीटर धावणाऱ्या मंगळुरुतील मुदाबिद्री येथील श्रीनिवास गौडाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडीयुरप्पा यांनी सत्कार केला आहे. श्रीनिवासाने १ फ्रेब्रुवारीला काद्री येथे आयोजित केलेल्या कंबाला या (रेड्यांची दौड) स्पर्धेत सदर विक्रम आपल्या नावी केला होता.
कंबाला या स्पर्धेत रेड्यांना घेऊन पाण्यातून धावले जाते. या स्पर्धेत दक्षिन कन्नडा जिल्ह्यातील मुदाबिदरी या गावातील श्रीनिवासा हा तरुण रेड्यासमवेत धावला होता. या स्पर्धेत त्याने १४२.५ मीटरचे अंतर केवळ १३.६ सेंकदात कापले होते. त्याच्या या विक्रमाची तुलना जमैकाच्या उसेन बोल्टशी केली जात आहे.
उसेन बोल्ट यांनी १०० मीटर अंतर फक्त ९.५८ सेंकंदात पूर्ण केले होते. मात्र, गौडाने हेच अंतर ९.५५ सेंकदात पूर्ण केले. मात्र, दोघांच्या विक्रामांची तुलना करणे योग्य नाही. कारण, बोल्ट हे एकटे तर गौडा हे रेड्यांच्या स्पर्धेत धावले होते.
हेही वाचा- निर्भया प्रकरण : अखेर वेळ ठरली... दोषींना 3 मार्चला फाशी