दक्षिण परगणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगालमध्ये हस्तक्षेप करत आहेत. आम्ही हे सर्व शांतपणे पहात आहोत. आम्ही शांत आहोत ही आमची कमजोरी समजू नका, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगालमध्ये समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. दक्षिण २४ परगणा येथील एका सभेत त्या बोलत होत्या.
तुम्ही माझा आणि बंगालचा अपमान केला आहात. तुम्ही बंगालमधील सरकारही मला चालवू देत नाही, असे ममता म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात वाकयुध्द सुरु आहे. यापूर्वीही ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका केली होती. मोदी यांची छाती ५६ इंच आहे, त्यांना मारल्यास माझा हात तुटेल असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी बसीरहाट येथील एका सभेत केले होते.
मोदी हे बंगालमध्ये आल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर पैसे खाण्याचा (तोलबाज) आरोप केला होता. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदींना लोकशाहीची थप्पड' मारायची आहे, असे वक्तव्य केले होते.