ETV Bharat / bharat

दिल्लीतील जीवनावश्यक सेवा २४ तास खुल्या राहणार; केजरीवाल सरकारचा निर्णय

घरपोच अन्न देणाऱ्या ऑनलाईन सुविधा सुरू राहणार. डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

दिल्लीतील जिवनावश्यक सेवा २४ तास खुल्या राहणार; केजरीवाल सरकारचा निर्णय

author img

By

Published : Mar 26, 2020, 2:36 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक घेऊन निर्णय जारी केले आहेत. जीवनावश्यक आणि दैनंदिन वस्तूंची दुकाने २४ तास खुली राहणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच विविध कंपन्या आणि कारखानेही सुरूच राहतील, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

घरपोच अन्न देणाऱ्या ऑनलाईन सुविधा सुरू राहणार. डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

आरोग्यसेवेच्या दृष्टीने दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक सुरु ठेवण्यात येतील. मात्र, यादरम्यान सर्व काळजी घेतली जाईल, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली.

दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. देशातील रुग्णांची संख्या ६४९ झाली असून आतापर्यंत १३ बळी गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.