ETV Bharat / bharat

'.. तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा'

महाराष्ट्राला महाराष्ट्र बनविण्यात उत्तर भारतीयांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीय सुरक्षित नाहीत. त्यामुळे मी चिंतेत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

chirag paswan
चिराग पासवान
author img

By

Published : Sep 12, 2020, 8:22 PM IST

पाटणा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चिराग पासवान यांनी केली आहे. चिराग पासवान हे लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. 'महाराष्ट्रात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय राहतात. महाराष्ट्राला महाराष्ट्र बनविण्यात उत्तर भारतीयांचे मोठे योगदान आहे. तेथे उत्तर भारतीय सुरक्षित नाहीत. त्यामुळे मी चिंतेत आहे', असे चिराग पासवान म्हणाले. ईटीव्ही भारतशी त्यांनी खास चर्चा केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा - चिराग पासवान

'दोन महिने होऊन गेले, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास लागला नाही. तोसुद्धा बिहारमधील होता. या प्रकरणात महाराष्ट्र पोलीसांना दोन महिन्यांत एका आरोपीलाही अटक करता आली नाही. कोणावर एफआयआरही दाखल करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील स्थिती पाहता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी, असे मत चिराग पासवान यांनी व्यक्त केले.

शिवसेनेवर हल्लाबोल

महाराष्ट्रात निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली. त्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांचे मीम फॉर्वर्ड केले होते. हे चुकीचं आहे. तुम्ही कोणाला मारू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. शिवसेनेत तर व्यंगचित्र काढण्याची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र काढत होते. अंत्यत कठीण मुद्देही ते सोप्या पद्धतीनं मांडत होते, असे चिराग पासवान म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.