ETV Bharat / bharat

चिराग पासवान यांचा नितीश यांना हिसका! जाणून घ्या एलजेपीमुळे किती जागांवर झाला पराभव

author img

By

Published : Nov 11, 2020, 8:43 AM IST

प्रचारादरम्यान चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच त्यांनी जनता दल (यु) च्या विरोधात सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्याचा थेट फटका नितीश कुमार यांना बसला असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

chirah paswan cut jdu's 50 seates
चिराग पासवान नितीश कुमार मते

पाटणा - बिहारमधील निवडणूक मोठी चुरशीची पाहायला मिळाली. महागठबंधन आणि एनडीए यांच्यात सत्तेसाठी शेवटपर्यंत चुरस होती. अखेर एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले. असे असले तरी नितीश कुमार यांच्या जनता दल (यु) चे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा जागा कमी झाल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

नितीश कुमारांना पासवान यांचा झटका

प्रचारादरम्यान चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच त्यांनी जनता दल (यु) च्या विरोधात सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्याचा थेट फटका नितीश कुमार यांना बसला असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. चिराग यांच्या एलजेपीमुळे नितीश यांना जवळपास ०८ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे जेडीयूला पन्नासचा आकडाही पार करता आला नाही. कधी काळी पहिल्या क्रमांकावर असलेली जेडीयू या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

मटिहानीमध्ये जेडीयूचे नुकसान

बेगूसराय जिल्ह्यातील मटिहानी येथे सीपीआयचे उमेदवार राजेंद्र प्रसाद सिंह निवडून आले आहेत. त्यांना 37 हजार मते मिळाली आहेत. तर जेडीयूच्या बोगो सिंग यांना 31 हजार मते मिळाली आहे. विशेश म्हणजे याचठिकाणी एलजेपी उमेदवार राजकुमार सिंह यांनी 26 हजारपेक्षा जास्त मते मिळाली म्हणजेच जर एलजेपी-जेडीयू सोबत असते तर जेडीयूचा विजय निश्चितच झाला असता.

महिषी आणि महुआमध्ये मते कापली

महिषामध्ये आरजेडीच्या गौतम कृष्णा यांनी बाजी मारली आहे. त्यांना 47 हजार मते मिळाली आहेत. त्याचबरोबर जेडीयूच्या गुंजेश्वर यांना 45 हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. एलजेपीच्या उमेदवाराने इथेही जवळपास 7 हजार मते कापली आहेत. इथेही एकत्रिपणे लढले असते तर जेडीयूच्या उमेदवाराने विजय मिळविला असता. महुआ विधानसभा मतदारसंघातून लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप निवडणूक लढले होते. मात्र यावेळी आरजेडीने राकेश रोशन यांना महुआतून तिकीट दिले होते. राकेश यांना सुमारे 30 हजार मते मिळाली. तर जेडीयूचे उमेदवार असम परवीन यांना 24 हजाराहून अधिक मते मिळाली. येथे एलजेपीचे उमेदवार संजय कुमार सिंह यांना जवळपास 12 हजार मते मिळाली. इथे आरजेडीचे रोशन निवडणूक जिंकत आहेत. यावेळी चिराग यांनी मते न कापली नसती तर जेडीयूने सहज विजय मिळवला असता.

बिहार सरकरमधील मंत्री पराभूत

जहानाबाद मतदारसंघातून बिहार सरकारचे मंत्री कृष्णनंदन वर्मा हे निवडणूक हरले आहेत. कृष्णनंदन वर्मा यांना सुमारे 35 हजार मते मिळाली. येथे आरजेडीचे सुदय यादव यांना 63 हजार मते मिळाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली. येथे एलजेपीच्या उमेदवार इंदू देवी यांनी सुमारे 20 हजार मते घेतली.

कुर्था आणि नोखामध्ये मते कापली

कुर्था येथेही कुमार वर्मा यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी जेडीयूच्या सत्यदेव कुशवाह यांना आठ हजार मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे इथेही एलजेपी उमेदवाराला 8 हजाराहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे या जागा स्वतंत्रपणे लढल्या गेल्या नसत्या तर जेडीयू जिंकू शकला असता, असे म्हणता येईल. आरजेडीच्या अनिता देवी यांनी नोखा येथून विजय मिळवला आहे. त्यांनी जेडीयू उमेदवार नागेंद्र चंद्रवंशी यांचा पराभव केला. येथे एलजेपीचे कृष्णा कबीर यांनी 11 हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. सासाराम येथे आरजेडीचे राजेश कुमार गुप्ता यांनी विजय मिळवला आहे. तर जेडीयूचे अशोक कुमार 32 हजार मते मिळवूनही 10 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. येथे एलजेपीच्या रामेश्वर चौरसिया यांनी सुमारे 12 हजार मते मिळाली आहेत.

मंत्री जय कुमार सिंग यांचाही पराभव

नितीशकुमार यांचे मंत्री जय कुमार सिंह देखील दिनारामध्ये पराभूत झाले. येथे आरजेडीच्या विजय कुमार मंडळा यांना 50 हजाराहून अधिक मते मिळाली. त्याचवेळी एलजेपीचे उमेदवार राजेंद्र सिंह यांना 46 हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. तर जय कुमार सिंग यांना केवळ 21 हजार मते मिळाली.

हेही वाचा - बिहारमध्ये एनडीएला काठवरचे बहुमत; तेजस्वी यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगले

हेही वाचा - बिहारच्या जनतेला जंगलराज नव्हे तर विकास हवा आहे - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.