जयपूर - राजस्थानमधील जयपूर शहरात चिनी मांजाने एका चार वर्षाच्या मुलाचा जीव घेतला आहे. आपल्या वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना चिनी मांजा रस्त्यात आडवा आल्याने चिमुकल्याचा गळा कापला गेला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरामधील त्रिपोलिया बाजार परिसरामध्ये घडली.
हेही वाचा - राहुलसह प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठ बाहेरच रोखले, दोघेही दिल्लीकडे रवाना..
फैजुद्दीन असे मृत मुलाचे नाव असून तो नर्सरीमध्ये शिकत होता. फैजुद्दीन आणि त्याचे वडील काल (सोमवारी) ५ वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांकडे चालले होते. त्यावेळी मांजा रस्त्यात आडवा आल्याने फैजुद्दीनचा घळा कापला गेला, जास्त रक्तस्त्राव झाल्याने फैजुद्दीनचा मृत्यू झाला.
हेही वाचा - VIDEO : अन् पुलाखाली अडकले विमान..
देशभरामध्ये चिनी मांजाला बंदी असूनही त्यांची विक्री केली जाते. पोलीस कारवाईच्या नावाने विक्रेत्यांविरुद्ध अभियानही चालवतात. मात्र, तरीही काही विक्रेते चिनी मांजा विकतात. या मांजामुळे पक्षाचाही मृत्यू होतो. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक गुप्ता यांनी अवैधरित्या चिनी मांजा विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिली असून चिनी मांजा विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितले.