ETV Bharat / bharat

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीननं सीमेवर तैनात केले 'मार्शल आर्ट फायटर' - मिक्स्ड मार्शल आर्ट फायटर

चीनमधील पाच नव्या 'मिलिटीया तुकड्या' सीमेवर आणण्यात आल्या आहेत. यामध्ये 'मिक्स्ड मार्शल आर्ट क्लब'सह माऊंट एव्हरेस्ट ऑलंपिक टार्च रिले संघातील माजी सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती अहवालांतून समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 28, 2020, 6:46 PM IST

बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चीनने सीमेवर 'मार्शल आर्ट फायटर' तैनात केले असल्याची माहिती अहवालांतून समोर येत आहे. 15 जूनला सीमेवर झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

चीनमधील पाच नव्या 'मिलिटीया तुकड्या' भारत- चीन नियंत्रण रेषेवर आणण्यात आल्या आहेत. यामध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट क्लबसह माऊंट एव्हरेस्ट ऑलंपिक टार्च रिले संघातील माजी सदस्यांचा समावेश आहे. तिबेटची राजधानी ल्हासा येथे त्यांना आधी आणण्यात आले, असे वृत्त चिनी लष्कराच्या अधिकृत चायना नॅशनल डिफेन्स न्यूजने दिले आहे.

नव्याने दाखल झालेल्या सैनिकांमुळे सीमेवर चीनची ताकद वाढणार असून सैनिकांना कोणत्याही घटनेस तत्काळ प्रतिसाद देता येईल, असे तिबेटचे कमांडर वँग हाईजँग यांनी सांगितले. मात्र, भारताबरोबर झालेल्या सीमा वादानंतर ही नवी तुकडी तैनात करण्यात आली आहे का? यावर काहीही उत्तर दिले नाही.

15 जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनचे सुमारे 40 जवान शहीद झाले. हाणामारीत शस्त्रांचा वापर करण्यात आला नाही. तर लाकडे, लोखंडी रॉड आणि हाताने जवानांनी एकमेकांना मारहाण केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.