नवी दिल्ली - लडाखमधील तणावांच्या पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये उच्च क्षमतेच्या तोफा तैनात केल्या आहेत. या तोफा 4,600 मीटर उंचीवर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तैनात केल्याने भारताचा बराच भाग त्याच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात येणार आहे.
याच बरोबर चीनने त्यांची 150 लाईट कंबाइन्ड शस्त्राने सज्ज असलेली सैन्याची 77 वी तुकडी तिबेटच्या मिलीटरी डिस्ट्रिक्टमध्ये तैनात केली आहे. चीनने एलएसीवर आपल्या सैन्याची हालचाल वाढवली आहे.
सीमावादावरील चर्चा रेंगाळली..
जुलैच्या मध्यवधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे. पँगाँग त्सो, डेपसांग या भागातून चीन मागे हटायला तयार नसल्याने चर्चा पुढे जात नाही. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत.