ETV Bharat / bharat

बहिणीच्या भावूक आवाहनानंतर रक्षाबंधनदिवशीच नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण - Raksha Bandhan different news

मल्ला हा वयाच्या 12 व्या वर्षी नक्षली चळवळीत सामील होण्यासाठी घरातून पळून गेला होता. तो रक्षाबंधनाच्या दिवशी 14 वर्षानंतर दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावात परतला आहे.

नक्षलवादी भावाला ओवाळता बहिण
नक्षलवादी भावाला ओवाळता बहिण
author img

By

Published : Aug 3, 2020, 7:05 PM IST

रांची - रक्षाबंधनादिवशी बहिण-भावाच्या प्रेमातील अतूट नाते दाखविणारी घटना समोर आली आहे. दंतेवाडात आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी हा बहिणीला भेटण्यासाठी रक्षाबंधनादिवशी गावी परतला. बहिणीने विनंती केल्यानंतर हा मल्ला नावाचा नक्षलवादी पोलिसांना शरण आला आहे.

मल्ला हा वयाच्या 12 व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होण्यासाठी घरातून पळून गेला होता. तो रक्षाबंधनाच्या दिवशी 14 वर्षानंतर दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावात परतला आहे.

बहिणीच्या भावूक आवाहनानंतर रक्षाबंधनदिवशीच नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

गेली काही वर्षे बहीण लिंगाय हिची भेट न झाल्याने मल्ला हा तिला भेटण्यासाठी परतला होता. भावाच्या अचानक झालेल्या भेटीने आश्चर्याचा धक्का बसलेल्या लिंगायने भावाला जंगलात जाण्यापासून रोखले. सुरक्षा दलाकडून नक्षलवादी मारले जात आहेत. अशा परिस्थितीत तिने पोलिसांना शरण जा, असा सल्ला भावाला दिला. मल्लाने पूर्वीच्या आयुष्याबाबत माहिती देताना सांगितले, की 2016 पासून तो प्लाटून डेप्युटी कमांडर आहे. ही प्लाटून भैरामगढ परिसरात आहे.

अनेक हल्ल्यात मल्ला नक्षलवाद्याचा सहभाग-

दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव म्हणाले, की मल्ला हा भैरामगढमध्ये प्लाटून कमांडर होता. अनेक पोलिसांनी जीव गमाविलेल्या नक्षली हल्ल्यात गेल्या दशकभरात त्याने सहभाग घेतला आहे. तो 'लोन वाराट्टू' या योजनेतून शरण आला आहे. या योजनेतून स्थानिकांच्या मदतीने पोलीस हे नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांचे सरकारकडून पुनर्वसन करण्यात येते. तसेच त्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात येते. नुकतेच मल्लाला अटक करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने कोणत्या प्रकारे काम केले याची अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलीस अधीक्षक पल्लव यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.