रायपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड सरकारने बऱ्याच पूर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. यामध्ये अभियांत्रिकी (पीईटी), फार्मसी (पीपीएचटी), पॉलिटेक्निक (पीपीटी) आणि कम्प्युटर अॅप्लिकेशन्स (पीएमसीए) या वर्गांच्या पूर्व परिक्षांचा समावेश आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नोटीसनुसार या पूर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, आता विद्यार्थ्यांना मागील वर्गात मिळालेल्या मेरिटनुसार या वर्गांमध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने यासंबंधी अधिकृत आदेशही जारी केला आहे.
![Chhattisgarh announces cancellation of exams amid lockdown](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8188071_cc.jpg)
दरम्यान, अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत यूजीसी अद्यापही ठाम आहे. मात्र, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसारख्या राज्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत परीक्षा न घेण्याची भूमीका घेतली आहे.
हेही वाचा : पुन्हा एकदा चीनला दणका; आणखी ४७ अॅप्सवर बंदी