ETV Bharat / bharat

सूरतच्या एका फ्लॅटमध्ये थाई महिलेचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत, परिसरात खळबळ - surat crime news

सूरतच्या मगडल्ला परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एका थाई महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलीसांनी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा असून अधिक तपास सुरू आहे.

महिलेचा मृतदेह
महिलेचा मृतदेह
author img

By

Published : Sep 6, 2020, 5:20 PM IST

सूरत : येथील एका फ्लॅटमध्ये थाई महिलेचा मृतदेह रविवारी जळालेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शहरातील मगडल्ला परिसरात उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मिम्मी असल्याची माहिती तिच्या शेजाऱ्यांनी दिली.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिम्मीच्या शेजार्‍यांना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ती भाड्याने राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसले होते. तर, शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास एक महिला तिच्या घरी येऊन गेल्याचेही शेजाऱ्यांनी सांगितले. सदर महिलेच्या फ्लॅटचे दार आतून बंद होते. तिच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून तो आल्यानंतरच ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत माहिती मिळू शकेल असे, सहायक पोलीस आयुक्त ए के वर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, या महिलेबाबतची अधिक माहिती थायलँडमधून गोळा केली जात आहे. तसेच, कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरातील रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमधूनही काही माहिती मिळते का, याचा तपास सुरू असल्याचे वर्मा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - चिंताजनक... कोविड रुग्ण संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, ब्राझीलपेक्षाही जास्त बाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.