ETV Bharat / bharat

देशातील पर्यटनस्थळांच्या ऑनलाइन तिकिटांवर असणार पर्यटकांचे नाव - ताजमहल तिकीट नोंदणी बातमी

देशातील पर्यटनस्थळांच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीमध्ये बदल केला आहे. आता एका वेळेला पाचच टिकीट नोंदणी करता येणार असून या तिकिटांवर पर्यटकांचे नावसुद्धा असणार आहे. तिकिटांमध्ये होणारा काळाबाजार तसेच पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेता एएसआईने हा निर्णय घेतला आहे.

while-booking-the-taj-mahal-tickets-the-tourist-will-have-to-mention-id-cardwhile-booking-the-taj-mahal-tickets-the-tourist-will-have-to-mention-id-card
देशातील पर्यटनस्थळांच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीमध्ये बदल; तिकिटांवर असणार पर्यटकांचे नाव
author img

By

Published : Nov 29, 2020, 5:07 PM IST

आग्रा (उत्तरप्रदेश) - भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ताजमहाल तसेच देशातील अन्य पर्यटनस्थळांच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीमध्ये बदल केला आहे. आता एका वेळेला पाचच टिकीट नोंदणी करता येणार असून या तिकिटांवर पर्यटकांचे नावसुद्धा असणार आहे. तिकिटांमध्ये होणारा काळाबाजार तसेच पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेता एएसआईने हा निर्णय घेतला आहे. या नविन तिकीट प्रणालीमुळे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. ताजमहाल बघायला येणाऱ्या पर्यटकांनी ऑनलाइन तिकीट नोंदणी करूनच यावे, असे आवाहन एएसआईने केले आहे.

मोठ्या प्रमाणात होत होता काळाबाजार -

आठवड्याच्या शेवटी ताजमहाल पहायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्याचे नुकसान पर्यटकांना होत होते. त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे ताजमहाल न बघता पर्यटाकांना माघारी जावे लागत असल्याने या तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत होती. कोरोनामुळे 188 दिवस ताजमहाल तसेच आग्राचा किल्ला बंद होता. परंतु 17 मार्चपासून देशातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी उघडण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे दोन शिफ्टमध्ये पाच हजार पर्यटकांनाच ताजमहालमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

तिकीट नोंदणासाठी ही लागणार कागदपत्रे -

ऑनलाइन तिकीट नोंदणी ही एएसआईच्या वेबसाईट आणि अ‌ॅपद्वारे करता येणार आहे. याकरिता आधार कार्ड, पासपोर्ट, प‌ॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आईडी कार्ड यापैकी एक ओळखपत्राचा वापर करता येणार आहे. तसेच ताजमहाल बघायला येताना ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हेही वाचा- 'शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक दहशतवाद्यांसारखी'; संजय राऊतांची केंद्रावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.