ETV Bharat / bharat

Chandrayaan २ : 'चंद्र आहे साक्षीला'... इस्रो रचणार इतिहास!

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम; काही तासांमध्ये चांद्रयान - 2 उतरणार चंद्रावर...

ऐतिहासिक रात्र
author img

By

Published : Sep 6, 2019, 10:40 AM IST

Updated : Sep 6, 2019, 7:22 PM IST

बंगळुरू - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ काही तासांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या यशस्वी लँडिंगनंतर रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनंतर चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान-२ काही तासांमध्ये चंद्रावर उतरणार

चांद्रयान-२ चे लँडिंग यानातील कमीतकमी आठ साधनांद्वारे पार पाडली जाणार असल्याचे इस्रोने सांगितले. विक्रम लँडरसोबत प्रज्ञान हे रोव्हर देण्यात आले असून, रात्री १:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरला घेऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. शनिवारी पहाटे ६:३० वाजण्याच्या सुमारास चांद्रयान पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रमपासून रोव्हर वेगळे होईल असे के. सिवन, यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा - चांद्रयान - २ चा अंतिम टप्पाही यशस्वी; दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला उतरणार यान

भारताचे प्रतिक असलेली चिन्हे रोव्हर आणि लँडरवर आहेत. रोव्हरला सहा चाके असून, मागील दोन चाकामधील एका चाकावर अशोक चक्र आणि दुसऱ्या चाकावर इस्रोचे प्रतिक आहे. रोव्हरवर भारतीय ध्वज असल्याचे सिवन यांनी सांगितले.

चांद्रयान - २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? याच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत. चांद्रयान २ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे ६०-७० विद्यार्थी बंगळुरुमधील इस्रो सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.

Intro:Body:

ऐतिहासिक रात्र : संपूर्ण विज्ञान जगताचे भारताकडे लक्ष, चांद्रयान-२ काही तासांमध्ये चंद्रावर उतरणार
बंगळुरू - भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ काही तासांमध्ये शुक्रवारी उत्तररात्री दीड वाजल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.  चांद्रयान-२ च्या यशस्वी लँडिंगनंतर रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत चौथा देश बनेल. मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे.
चांद्रयान-२ लँडिंग यानातील कमीतकमी आठ साधनांद्वारे पार पाडली जाणार असल्याचे इस्त्रोने सांगितले. विक्रम लँडरसोबत प्रज्ञान हे रोव्हर देण्यात आले असून रात्री १:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरला घेऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. शनिवारी पहाटे ६:३० वाजण्याच्या सुमारास चांद्रयान पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रमपासून रोव्हर वेगळे होईल असे के. सिवन,  यांनी सांगितले आहे.
भारताची प्रतिक असलेली चिन्हे रोव्हर आणि लँडरवर आहेत. रोव्हरला सहा चाके असून मागील दोन चाकामधील एका चाकावर अशोक चक्र आणि दुसऱया चाकावर इस्रोचे प्रतीक आहे. जेव्हा रोव्हर बाहेर येईल आणि चंद्रावर उतरेल त्यावर भारतीय ध्वज असल्याचे सिवन यांनी सांगितले.
चांद्रयान - २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? याच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत. चांद्रयान २ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.
चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील  सुमारे ६०-७० विद्यार्थ्यी बंगळुरुमधील इस्त्रो सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.

Conclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.