ETV Bharat / bharat

चांद्रयान - २ : ऑर्बिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरित्या वेगळा

आज भारतासाठी महत्वाचा दिवस असून. ऑर्बिटरपासून विक्रम लँडर यशस्विरित्या वेगळा झाला आहे.

फोटो सौ. - इस्रो
author img

By

Published : Sep 2, 2019, 10:31 AM IST

Updated : Sep 2, 2019, 2:19 PM IST

बंगळूरू - आज दुपारी १.१५ वाजता चांद्रयान २ मधील ऑर्बिटरपासून विक्रम लँडर हा यशस्वीपणे वेगळा झाला आहे. हा लँडर सध्या ११९ कि.मी x १२७ किमी कक्षेत असून सध्या ऑर्बिटर हा चंद्राच्या कक्षेत फिरत आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

चंद्रयान -2 ऑर्बिटर आणि लँडरच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असून पुढील दिशा उद्या (मंगळवार) सकाळी ८.४५ ते ९.४५ दरम्यान ठरविण्यात येणार आहे.

दरम्यान, चांद्रयान २ चे १५ जुलैला प्रक्षेपण होणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर २२ जुलैला चांद्रयान २ चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी या चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावल्याने इस्रोने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान २ ची यात्रा ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांची असणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 2, 2019, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.