ETV Bharat / bharat

Loksabha Election 2019 : चंद्रबाबू नायडू यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची दिल्ली येथे भेट घेतली. भाजपच्या विरोधात महाआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याची चर्चा आहे.

author img

By

Published : May 18, 2019, 5:40 PM IST

चंद्रबाबू नायडू यांनी घेतली पवारांची भेट

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीमागचे कारण हे भाजपच्या विरोधात महाआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याची चर्चा आहे.

चंद्रबाबू नायडू हे तिसरी आघाडी बणवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. १७ मेला नवी दिल्ली येथे त्यांनी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. नायडू यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर चंद्रबाबू नायडू हे लखनऊ येथे जाणार आहेत. तिथे ते बसपा प्रमुख मायावती तसेच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. आम आदमी पक्षाकडून या भेटीला एक शिष्टाचार बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Intro:Body:

Nationl

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.