ETV Bharat / bharat

ICICI बँक घोटाळा : ईडीकडून चंदा कोचर यांची आज चौकशी

कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

author img

By

Published : Mar 2, 2019, 10:21 AM IST

Chanda Kochhar

मुंबई - अवैधरित्या कर्ज दिल्या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांची आज सक्तवसुली संचालनालयकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

शुक्रवारी चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या निवास स्थानांवर ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. देशातील तिसरी मोठी बँक समजल्या जाणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांच्यावर अवैध कर्ज दिल्याचा ठपका आहे. हे कर्ज त्यांनी, त्यांचे पती व उद्योजक दीपक कोचर यांच्या सांगण्यावरून व्हिडिओकॉन समुहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांना दिले होते. यानंतर नियमबाह्य वर्तनासंबंधी बँकेने त्यांची अंतर्गत चौकशी केली होती. त्यामध्ये त्या दोषी आढळल्या आहेत.

चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर आज मुंबईच्या घरावर तपास होणार आहे. तर, आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेणारे वेणुगोपाल धूत यांच्याही औरंगाबाद येथील घराची झडती घेतली जाणार आहे.

undefined

चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि धूत या तिघांना लुकआउट नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिशीमुळे ते देश सोडून परदेशात जाऊ शकत नाहीत. या नोटिशी अंतर्गत त्यांना देशाबाहेर पडण्याच्या ठिकाणांवर रोकण्यात येईल. लुकआउट नोटीस आर्थिक गैरव्यवहार करण्याऱ्यांच्या विरोधात जाहीर केली जाते.

Intro:Body:

CHANDAKOCHAR

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.