नवी दिल्ली - मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणूक आयोग असणाऱ्या मतभेदावर होणाऱ्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोणत्याही संस्थेत असे होणे स्वाभाविक आहे. सर्व सदस्यांचे मत एकच असावे हे गरजेचे नाही.
माध्यमात निवडणूक आयोगाचे सदस्य अशोक लवासा यांचे वक्तव्य आले आहे. आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावर अशोक लवासा हे सहमत नव्हते. त्यांच्या मताची दखल घेतली जावी असे त्यांची ईच्छा होती, मात्र असे झाले नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगिलते की, सामान्यपणे अशा गोष्टींची चर्चा बाहेर करणे योग्य नाही. जर एखादा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्याची मते तो आपल्या पुस्तकात लिहीत असतो. त्यानंतरच काही माहिती बाहेर येते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक लवासा हे नाराज आहेत. त्यामुळे चार मेपासून निवडणूक आचारसंहितेच्या मुद्द्यावरुन होणाऱया बैठकीपासून त्यांनी स्वताला दूर ठेवले आहे.