ETV Bharat / bharat

सीबीएसईच्या पुरवणी परीक्षेबाबत दखल घ्यावी; विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती - 800 CBSE students letter to supreme court

देशभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने सीबीएसईचे विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांना धोका आहे. त्यामुळे सीबीएसईच्या पुरवणी परीक्षेबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती संदीप गौरव यांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Aug 12, 2020, 2:01 PM IST

नवी दिल्ली - विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेनंतर सीबीएसईच्या पुरवणी परीक्षेचा (कम्पार्ट एक्झाम) प्रश्नही सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे. देशभरातील 800 विद्यार्थ्यांनी पत्र लिहून सीबीएसई परीक्षेच्या पुरवणी परीक्षेबाबत सू मोटोने निर्णय घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

ऑल इंडिया स्टुंडस असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव संदीप गौरव यांनी सीबीएसईच्या 809 विद्यार्थ्यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले आहे. देशभरात कोरोनाचे संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने सीबीएसईचे विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांना धोका आहे. त्यामुळे सीबीएसईच्या पुरवणी परीक्षेबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती संदीप गौरव यांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, सीबीएईच्या पुरवणी परीक्षेबाबत अद्याप बदल झाल्याची माहिती नाही. बहुतांश महाविद्यालयांनी परीक्षेची अंतिम तारीख दिल्याची विद्यार्थ्यांनी सांगितले. कोरोना महामारीची स्थिती सामान्य होईपर्यंत तात्पुरती परीक्षा स्थगित करा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

सीबीएसईच्या निकालानंतर दहावीतील 1 लाख 50 हजार 198 विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे. तर बारावीतील 87 हजार 651 विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि तेलंगाणा राज्याने पुरवणी परीक्षा रद्द केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.