ETV Bharat / bharat

'सीबीएसई ऑनलाईन परिक्षांसाठी सज्ज नाही, तयारीला आणखी काही वर्ष लागतील'

कोरोना आणि परीक्षा याविषयी सीबीएसईचे माजी अध्यक्ष अशोक गुलेरिया यांनी ईटीव्ही भारतशी विशेष चर्चा केली. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास सीबीएसई बोर्ड तयार नसल्याचे बोर्डाचे माजी अध्यक्ष अशोक गुलेरिया यांनी मत व्यक्त केले.

author img

By

Published : Jun 26, 2020, 7:52 PM IST

अशोक गुलेरिया
अशोक गुलेरिया

हैदराबाद - कोरोनामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनने सर्वांना व्हर्च्युअल म्हणजेच ऑनलाईन शिक्षणाकडे वळण्यास भाग पाडले आहे. मात्र, भारत अजूनही या स्वप्नापासून दुर असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास सीबीएसई बोर्ड तयार नसल्याचे बोर्डाचे माजी अध्यक्ष अशोक गुलेरिया यांनी म्हटले आहे.

कोरोना आणि परीक्षा याविषयी त्यांनी ईटीव्ही भारतशी विशेष चर्चा केली. यावेळी गुलेरिया म्हणाले, अनेक घटकांची सरमिसळ असल्यामुळे आपले व्यवस्थापन ऑनलाईन परीक्षा घेण्यास अजूनतरी तयार नाही. सीबीएसई बोर्डात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, प्रत्येक शाळेकडे या सुविधा देण्याची क्षमता असेल, असे मला वाटत नाही. यासाठी कमीतकमी 3 ते 4 वर्षांची गरज आहे. सर्वसमावेशक आणि सतत मुल्यमापन करण्याची पद्धती आपल्याकडे हवी. त्यामुळे जर एखादी महामारी आलीच तर त्याआधारे विद्यार्थ्यांना गुण देता येतील.

सीबीएसई ऑनलाईन परिक्षांसाठी सज्ज नाही

संसाधनांची कमतरता आणि नेटवर्कमध्ये अडचणी असल्याने ऑनलाईन परीक्षा घेणे शाळांसाठी कंटाळवाणे ठरेल. मोठ्या संख्येने शाळा आणि विद्यार्थी सीबीएसईशी जोडले गेले आहेत. ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य नाही, मात्र, शाळांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी काही वर्ष अजून काही वर्ष लागतील, असे गुलेरिया म्हणाले.

मागील पेपरमध्ये मिळविलेल्या गुणांनुसार सीबीएसई आता 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल लावणार आहे. अनेक दिवसांपासून परीक्षा घ्याव्यात किंवा नाही यावरून सीबीएसईमध्ये खल चालला होता. मात्र, शेवटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.