नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डा(सीबीएसई)च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील परीक्षा फी २४ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. आता या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये ऐवजी १२०० रुपये फी जमा करावी लागेल. शिवाय खुल्या प्रवर्गातील शुल्कामध्येही वाढ करण्यात आली असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता ७५० ऐवजी १५०० रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे.
१२ वी बोर्डाच्या परीक्षेतील अतिरिक्त विषयासाठी एसी, एसटी विद्यार्थ्यांना ३०० रुपये जादा भरावे लागणार आहेत. यापूर्वी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येत नव्हते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी १५० रुपयांऐवजी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. पूर्णत अंध विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क माफ करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, जे विद्यार्थी अंतिम तारखेच्या अगोदर नव्या दरानुसार शुल्क जमा करणार नाहीत, त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नाही, त्यामुळे त्यांना २०१९-२० च्या परीक्षेसाठी बसता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. स्थानांतरण शुल्क (माइग्रेशन शुल्क) १५० रुपयावरून वाढवून ३५० रुपये करण्यात आले आहे. परदेशातील सीबीएसईच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच विषयांची बोर्ड परीक्षा फी आता १० हजार रुपये भरावी लागणार आहे, जी पूर्वी ५ हजार रुपये होती, तर अतिरिक्त विषयासाठी १ हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये भरावे लागतील.
१० वीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात असताना तर 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी ११ वीच्या वर्गात असताना परीक्षेची नोंदणी करावी लागणार आहे. सीबीएसईकडून गेल्या आठवड्यात परीक्षा शुल्क वाढीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती.
सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ; जाणून घ्या किती भरावी लागणार 'फी' - सीबीएसीई परीक्षा शुल्क
अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील परीक्षा फी २४ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. आता या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये ऐवजी १२०० रुपये फी जमा करावी लागेल.

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डा(सीबीएसई)च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील परीक्षा फी २४ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. आता या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये ऐवजी १२०० रुपये फी जमा करावी लागेल. शिवाय खुल्या प्रवर्गातील शुल्कामध्येही वाढ करण्यात आली असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता ७५० ऐवजी १५०० रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे.
१२ वी बोर्डाच्या परीक्षेतील अतिरिक्त विषयासाठी एसी, एसटी विद्यार्थ्यांना ३०० रुपये जादा भरावे लागणार आहेत. यापूर्वी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येत नव्हते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी १५० रुपयांऐवजी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. पूर्णत अंध विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क माफ करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, जे विद्यार्थी अंतिम तारखेच्या अगोदर नव्या दरानुसार शुल्क जमा करणार नाहीत, त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नाही, त्यामुळे त्यांना २०१९-२० च्या परीक्षेसाठी बसता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. स्थानांतरण शुल्क (माइग्रेशन शुल्क) १५० रुपयावरून वाढवून ३५० रुपये करण्यात आले आहे. परदेशातील सीबीएसईच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच विषयांची बोर्ड परीक्षा फी आता १० हजार रुपये भरावी लागणार आहे, जी पूर्वी ५ हजार रुपये होती, तर अतिरिक्त विषयासाठी १ हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये भरावे लागतील.
१० वीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात असताना तर 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी ११ वीच्या वर्गात असताना परीक्षेची नोंदणी करावी लागणार आहे. सीबीएसईकडून गेल्या आठवड्यात परीक्षा शुल्क वाढीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती.
सीबीएसीईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ; जाणून घ्या किती भरावी लागणार 'फी'
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डा(सीबीएसीई)च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनुसुचित जाती (एसी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील परीक्षा फी २४ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. आता या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० रुपये ऐवजी १२०० रुपये फी जमा करावी लागेल. शिवाय खुल्या प्रवर्गातील शुल्कामध्येही वाढ करण्यात आली असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता ७५० ऐवजी १५०० रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे.
१२ वी बोर्डाच्या परीक्षेतील अतिरिक्त विषयासाठी एसी, एसटी विद्यार्थ्यांना ३०० रुपये जादा भरावे लागणार आहेत. यापूर्वी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येत नव्हते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त विषयांसाठी १५० रुपयांऐवजी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. पूर्णत अंध विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क माफ करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, जे विद्यार्थी अंतिम तारखेच्या अगोदर नव्या दरानुसार शुल्क जमा करणार नाहीत, त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नाही, त्यामुळे त्यांना २०१९-२० च्या परीक्षेसाठी बसता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. स्थानांतरण शुल्क (माइग्रेशन शुल्क) १५० रुपयावरून वाढवून ३५० रुपये करण्यात आले आहे. परदेशातील सीबीएसईच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच विषयांची बोर्ड परीक्षा फी आता १० हजार रुपये भरावी लागणार आहे, जी पूर्वी ५ हजार रुपये होती, तर अतिरिक्त विषयासाठी १ हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये भरावे लागतील.
१० वीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात असताना तर 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी ११ वीच्या वर्गात असताना परीक्षेची नोंदणी करावी लागणार आहे. सीबीएसईकडून गेल्या आठवड्यात परीक्षा शुल्क वाढीसंदर्भात अधिसूचना प्रसारित करण्यात आली होती.
Conclusion: