भोपाळ : बहुचर्चित व्यापम घोटाळ्यासंबंधी सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ५७ नव्या आरोपींचे नाव समोर आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश ठरत होता अडचण..
बुधवारी उच्च न्यायालयाने दिलेला एक आदेश ही चार्जशीट दाखल करण्यास अडचण ठरत होता. या आदेशामध्ये न्यायालयाने म्हटले आहे, की सुनावणीसाठी सुमारे साठ आरोपींना एकत्र बोलावणे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य नाही. त्यामुळे एकावेळी पाच आरोपींना सादर करण्यात यावे. तसेच, आरोपींमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांना अगदी आवश्यक असेल तरच न्यायालयात हजर राहण्यास सांगावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अजय गोयनकांसह कित्येक आरोपी..
या प्रकरणात भोपाळच्या चिरायु वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजय गोयनकांसह, त्यांच्या मॅनेजमेंटचे दहावर अधिकारी आरोपी आहेत. तसेच, २७ विद्यार्थिनींनाही आरोपी ठरवण्यात आले आहे. या विद्यार्थिनींनी चुकीच्या पद्धतीने एमबीबीएसला प्रवेश घेतला होता.
अशा प्रकारे होत होता घोटाळा..
आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी कोट्यातील जागांवर जवळपासच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने भरले जात होते. त्यानंतर हा प्रवेश घेतलेला विद्यार्थी आपली जागा मोकळी करत असे. असे झाल्यानंतर महाविद्यालय प्रशासन आपल्याला हवी तेवढी फी आकारुन विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश देत असत. अशा प्रकारे विद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने हा घोटाळा होत.
सध्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने एडीजे सुरेंद्र श्रीवास्तव यांच्या न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. आता याप्रकरणी कशा प्रकारे कारवाई आणि सुनावणी पार पडेल याचा निर्णय न्यायालय घेणार आहे.
हेही वाचा : दिल्लीत कोरोना नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण; ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद करण्याचे आवाहन