देवरिया - उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवताना दिसत आहेत. देवरिया जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राजन यादव ऊर्फ अर्थीबाबा देखील नशीब आजमावत आहेत. मतांसाठी ते मतदारांच्या शेतात जाऊन काम करत आहेत. तसेच त्यांचे बूट पॉलिशही करत असल्याचेही पाहायला मिळाले.
मतदार राजा हा देव
राजन यादव यांनी मतदारांना देवाचा दर्जा दिला आहे. मतदारांनी मतदान केल्यानेच आपण सत्तेत येतो. तेव्हा मतदार हे देवाप्रमाणेच आहेत. म्हणून त्यांना देव समजून मी त्यांचे पाय धूत आहे, असे राजन यादव म्हणाले. राजन यादव यांनी मतदारांची पादत्राणे साफ केली असून बुटांना पॉलिशही केले.
मध्यप्रदेशातही 28 विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान -
मध्यप्रदेशातही 28 विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पोटनिवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. एकूण 28 जागांपैकी तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते.