नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने ठाकले आहेत. चीन आणि भारतादरम्यान असलेल्या एकूण सीमेपैकी अत्यंत कठीण असलेल्या 826 किलोमीटर लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये 'कॅमेरा वॉर' सुरु झाला आहे.
29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याने सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने ब्लॅक टॉप पोस्टवर कब्जा करत कॅमेरे आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसवली होती. ही पोस्ट भारतीय जवानांनी ताब्यात घेतली आणि तेथील कॅमेरे आणि पाळत ठेवण्याची उपकरणं हटवली.
चिनी पिपल्स लिबरेशन आर्मीने बसवलेले कँमेऱ्यामध्ये एचडी फिचर आहेत. हे कँमेऱ्याद्वारे दिवसा 6 किलोमीटर तर रात्री 3 किलोमीटरपर्यंतच्या परिसरावर नजर ठेवता येते. चीनने सीमेवरील देखरेखीची यंत्रणा स्वयंचलित केली आहे. भारतीय लष्कराच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे आणि सेन्सॉर बसवले आहेत. या माध्यमातून चिनी सैन्य भारतीय लष्कराच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे.
सिमेवर नजर ठेवण्यासाठी कँमेरे म्हत्त्वपूर्ण आहेत. चिनी पिपल्स लिबरेशन आर्मी पायी चालण्यापेक्षा गाड्याचा जास्त वापर करते. कॅमेऱ्यामधून भारतीय सैन्याच्या गस्ती दलास पाहिल्यास आपले गस्ती दल गाड्याद्वारे पाठवते. आता भारत ही कँमेऱ्याच्या माध्यमातून सिमेवर लक्ष ठेवून आहे. सोमवारी भारतीय लष्कारने चुमारमध्ये भारतच्या हद्दीत येणाऱ्या चीनी सैन्याच्या गाड्या कॅमेऱ्याद्वारेच पाहिल्या होत्या.