नारायणपुर (छ.ग.) - अमदई घाटी कॅम्पमध्ये जवानांमध्ये झालेल्या वादात एकाने सोबतच्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर एक प्लाटून कमांडर गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी रायपुरला पाठवण्यात आले आहे. मृतांमध्ये एक प्लाटून कमांडर आणि हवालदार यांचा समावेश आहे. हे जवान सीएएफ ९ (छत्तीसगड सशस्त्र दल) बटालियनचे होते.
एका विषयावरून या जवानांमध्ये वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान हिंसेत झाले. एका जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलने सोबतच्या जवानांवर गोळीबार केला. या घटनेत दोन जवांनाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याला रायपुर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस्तरचे आयजी सुंदरराजन पी. यांनी या घटनेची माहिती दिली. अमदई घाटी छोटेडोंगर ठाणे अंतर्गत येते.
राज्यात याप्रकारे कॅम्पमध्ये गोळीबार होण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
- फेबुवारीमध्ये बीजापूरच्या फरसेगढ येथे सीएएफ कॅम्पमध्ये एक जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांवर गोळी झाडली. यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला होता. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला होता.
- डिसेंबर 2019मध्येही दंतेवाडा येथे याचप्रकारची एक घटना घडली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने सुटीवरून कॅम्पवर येताना बसमध्येच आपल्या एका सहकाऱ्यावर फायरिंग केली होती. यात त्या जवानाचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर फायरिंग करणाऱ्या तरूणाने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.
- डिसेंबर 2019मध्ये दंतेवाडा येथूनही अशीच एक घटना समोर आली होती. नारायणपूर जिल्ह्यातील आयटीबीपी कॅम्पमध्ये एका जवानाने अंधाधुंद गोळीबार करत स्वत:ला गोळी मारून घेतली होती. या घटनेत एकूण 6 जवानांचा मृत्यू झाला होता.
- डिसेंबर 2017मध्येही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर फायरिंग केली होती. यात 4 जवानांचा मृत्यू झाला होता.