शरद पवारांना धक्का: बारामतीचे पाणी अखेर रोखले, राजकारण पेटणार ?
मुंबई - नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकराने मंजूर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सविस्तर वाचा....
पावसाळ्यात घशाला कोरड..! मुंबईकरांचे पाणी १६ जून पासून महागणार
मुंबई - मुंबईकरांचे पाणी १६ जूनपासून महागणार आहे. सध्याच्या दरापेक्षा २.४८ टक्क्यांनी पाणीपट्टी दरवाढ केली जाणार आहे. २०१२ पासून दरवर्षी ८ टक्के दरवाढ केली जात आहे. तशी मंजुरी पालिकेने दिली आहे. मात्र, बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांनी पाण्याच्या दरवाढीला विरोध केला. सविस्तर वाचा...
मुख्यमंत्री जेव्हा सांगतील तेव्हा मंत्रीपदाची शपथ घेईन - विखे पाटील
अहमदनगर- लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे माझा भाजप प्रवेश हा आता मुद्दा राहिला नाही, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये केले आहे. तसेच मला मंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि ते जेव्हा सांगतील तेव्हा शपथ घेणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सविस्तर वाचा...
चक्रीवादळामुळे ओव्हर ब्रिजचा गर्डर झुकला, बोर्डी स्थानकाजवळ रेल्वे सेवा ठप्प
पालघर - पश्चिम रेल्वेच्या बोर्डी स्थानकाजवळ ओव्हर ब्रिजचा गर्डर झुकल्याने रेल्वे सेवा ठप्प करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे हे गर्डर झुकले असून यामध्ये घटनास्थळी काम करणारे 4 कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा...
वेस्ट इंडिज क्रिकेटचा वाघ 'ताडोबा'त दाखल, 'ब्रायन लारा' उद्या करणार जंगल सफारी
चंद्रपूर - क्रिकेटविश्वात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारालाही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकअल्पाची भुरळ लागली आहे. येथील वाघाचे दर्शन करण्यासाठी तो एका दिवसापासून येथे ठाण मांडून बसला आहे. काल त्याचे आगमन झाले असून एका खासगी रिसॉर्टमध्ये त्याचा मुक्काम आहे. उद्या मोहूर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ताडोबा प्रकल्पाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सविस्तर वाचा...