ETV Bharat / bharat

इतिहासातील सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण; पण तब्येत बिघडल्याने राहिले अपूर्ण

यंदा त्यांनी २ तास ४१ मिनिटांचे भाषण केले. त्यामुळे इतके मोठे अर्थसंकल्पीय भाषण देणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही सर्वात मोठे भाषण देण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर होता.

Speech nirmala sitharaman
Speech nirmala sitharaman
author img

By

Published : Feb 1, 2020, 4:42 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना मध्येच अचानक त्यांची तब्येत बिघडली. भाषण सुरू असताना त्यांना अस्वस्थ वाटून घाम आला, त्यामुळे अर्थसंकल्पातील भाषणाचा काही भाग त्या वाचू शकल्या नाहीत. मात्र, तरीही त्यांचे भाषण स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे भाषण ठरले.

हेही वाचा - संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, नवीन शस्त्रास्त्रांसाठी १ लाख १० हजार ७३४ कोटी

यंदा त्यांनी २ तास ४१ मिनिटांचे भाषण केले. त्यामुळे इतके मोठे अर्थसंकल्पीय भाषण देणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही सर्वात मोठे भाषण देण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर होता. गेल्या वर्षी सीतारामन यांनी २ तास १७ मिनिटे भाषण केले होते. यंदा त्यांनी भाषणाचा स्वत:चाच विक्रम मोडला.

हेही वाचा - ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; मध्यमवर्गाला दिलासा

भाषण सुरू असताना सीतारामन यांना अचानक अस्वस्थ वाटून घाम आला. त्यामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काहींनी त्यांना खाली बसण्याची विनंती केली. मात्र, भाषणाची फक्त दोनच पाने वाचायची शिल्लक राहिली असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानंतर पुढील भाग कामकाजात समाविष्ट करून घ्यावा, अशी विनंती अध्यक्षांना करून त्या खाली बसल्या.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.