ETV Bharat / bharat

BS-VI गाड्यांसाठी ऑक्टोबर 2020 पासून 'ग्रीन स्टिकर' अनिवार्य

BS-VI वाहनांवर 1 सेंटीमीटरची हिरवी पट्टी लावणे आत अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते आणि वाहतून मंत्रालयाने या सबंधीचा आदेश जारी केला आहे.

बीएस 4 नियम
बीएस 4 नियम
author img

By

Published : Jun 7, 2020, 5:28 PM IST

नवी दिल्ली - पर्यावरण पुरक वाहनांच्या नियमावली अंतर्गत बीएस-4 वाहनांना आता एक सेंटीमीटरचे स्टिकर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या स्टिकरवर वाहनाची सर्व माहिती असणार आहे. हा आदेश 1 ऑक्टोबर 2020 पासून अमलात येणार आहे.

BS-VI वाहनांवर 1 सेंटीमीटरची हिरवी पट्टी लावणे आत अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या सबंधीचा आदेश जारी केला आहे. मोटार वाहन कायदा( हाय सिक्ट्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स) 2018 आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे.

सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य करण्याचा आदेश सरकारने 1 एप्रिल 2019 ला दिला आहे. ही नंबरप्लेट कोणत्याही नव्या वाहनाच्या पुढील काचेच्या आतून लावण्यात येणार आहे. एचएसआरपी नुसार क्रोमियमचा होलोग्राम नंबर प्लेटवर लावण्यात येणार आहे. मागच्या आणि पुढच्या नंबर प्लेटवरही हा होलोग्राम लावण्यात येणार आहे.

तिसऱ्या नंबर प्लेटमध्ये वाहनात वापरण्यात येणार इंधन कोणते आहे, ही माहीतीही असणार आहे. त्यासाठी कलर कोडींग करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदुषण करणारे वाहन सहज ओळखता येईल. बीएस-4 अंतर्गत कडक नियमावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱया वाहनासाठी फिक्कट निळा रंग असेल. तर डिजेल वाहनासाठी नारंगी रंग असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.