भोपाळ - मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार धोक्यात आले आहे. काँग्रेसचे १७ आमदार सध्या बेपत्ता असून, आणखी काही आमदारांचे फोनही 'स्विच ऑफ' लागत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक असलेल्या काही आमदारांचे फोन बंद लागत असून, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. तर त्याव्यतिरिक्त आणखी १७ आमदार बेपत्ता झाले आहेत. या सर्व आमदारांना शेवटचे बंगळुरू विमानतळावर पाहण्यात आले होते, अशी माहितीही मिळाली आहे.
कमलनाथ सरकार कोसळणार..?
१६ मार्चपासून मध्य प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी सत्राच्या पहिल्याच दिवशी भाजप कमलनाथ सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कमलनाथ सरकारकडे सध्या १२० आमदार आहेत. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा कमलनाथांकडे चार आमदार जास्त आहेत. यामध्ये काँग्रेसचे ११४, 'बसप'चे दोन, 'सपा'चा एक तर चार अपक्षांचा समावेश आहे.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या भावाला दिल्ली गुन्हे शाखेने घेतले ताब्यात