हैदराबाद - कुशाईगुडा परिसरात ७८ वर्षीय वृद्धाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना आज उघडकीला आली. या वृद्धाचा एका लाच प्रकरणात समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृत वृद्धाला नुकताच जामीन मिळाला होता आणि तेव्हापासून तो अस्वस्थ होता. त्याने विवंचनेत आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ऑगस्ट महिन्यात किसारा येथील तहसीलदार इ बालराजू नागाराजू यास १.१० कोटीची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने पकडले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या तहसीलदाराने चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली होती. या लाच प्रकरणात इतर आरोपींसह मृत वृद्धाला देखील अटक झाली होती. त्याला नंतर जामीन देण्यात आला होता.
हेही वाचा- 'महाबली फ्रॉग' : केरळ राज्याचा अधिकृत उभयचर प्राणी