नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठा बदल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटन महासचिव पदी बी. एल संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी रामलाल हे पक्षाचे संघटन महासचिव होते.
-
BL Santosh, Joint General Secretary Organisation has been appointed National General Secretary Organisation of Bharatiya Janata Party (BJP). pic.twitter.com/711zBlzh6I
— ANI (@ANI) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BL Santosh, Joint General Secretary Organisation has been appointed National General Secretary Organisation of Bharatiya Janata Party (BJP). pic.twitter.com/711zBlzh6I
— ANI (@ANI) July 14, 2019BL Santosh, Joint General Secretary Organisation has been appointed National General Secretary Organisation of Bharatiya Janata Party (BJP). pic.twitter.com/711zBlzh6I
— ANI (@ANI) July 14, 2019
2006 मध्ये भाजपच्या संघटन महासचिवपदाची जबाबदारी रामलाल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता संघटना महासचिव म्हणून बी. एल संतोष हे काम पाहणार आहेत. रामलाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहतील.
रामलाल यांनी ' माझे वय झाले असून मला माझ्या कार्यापासून मुक्त करून उपयुक्त कार्यकर्त्याची जबाबदारी द्यावी, माझ्या जागी एखाद्या उर्जावान व्यक्तीची नियुक्ती करावी, आशी मागणी नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांना पत्राद्वारे केली होती.
भाजपमध्ये संघटना महामंत्री आणि संघटना मंत्री हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून पाठवले जातात. या पदावरील व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम करते.