नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष ३०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असून, प्रचंड बहुमत असणारी एनडीए सरकार स्थापन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार आहेत. असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले केंद्र सरकारच्या ११९ सरकारी योजनांचा लाभ लोकांना झाला आहे.
निवडणूक निकालापुर्वी सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी दलाकडून भेटीगाठी वाढल्या होत्या. आंध्र प्रदेशनचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी पक्षातील नेत्याशी बैठक घेत आहेत पण त्याचा काही फायदा होणार नाही सरकार एनडीएच बनणार आहे असे गोपाल कृष्ण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, चंद्राबाबू नायडू यांनी जनताच आंध्र प्रदेशातून बेदखल करत आहे. लोकसभा निवडणुकीत टीडीपीची स्थिती खुपच खराब आहे. २३ मे ला लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवरच पराभवाचे खापर फोडणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजप १०० वर्ष केंद्रात सत्तेत असलं तरी ३७० कलम हटवू शकत नाहीत. यावर गोपाल कृष्ण म्हणाले, हे येणार काळच ठरवेल की कलम ३७० आम्ही हटवणार की नाही, तिहेरी तलाक, कलम ३७०, आर्टिकल ३५ ए, नागरिकता संशोधन विधेयकावर भाजपची काय भूमिका आहे हे सर्वांना माहीत आहे.
आज लोकसभेच्या अंतिम टप्प्याचे मतदान होते. यामध्ये ८ राज्यातील ५९ जागेवर मतदान झाले असून या सर्वांचे निकाल येत्या २३ तारखेला येणार आहेत.