नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील शाहीन बागमध्ये मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी 'शाहीन बाग ही देशद्रोही लोकांचा अड्डा' बनली असल्याचे वक्तव्य केले आहे.
शाहीन बाग ही देशद्रोही लोकांचा अड्डा बनली आहे. ज्या प्रकारची भाषणे शाहीनबागमध्ये सुरू आहेत. त्यावरून तिला शाहीन बाग नाही. तर दिशाहीन बाग म्हणायला हवे. शाहीन बागमधली भाषण चिंताजनक असून ते राष्ट्रविरोधी असल्याचेही पात्रा म्हणाले. तसेच पात्रा यांनी शाहीन बागवर आधारीत एका कवितेचे वाचन केले. देशविरोधी घोषणा देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान 15 डिंसेबरपासून शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एक मुख्य रस्ता बंद झाला आहे. दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हा रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते, पण याबाबत अधिक प्रगती झालेली नाही.
हेही वाचा - निर्भया प्रकरण: दया याचिका फेटाळल्यामुळे मुकेश सिंहची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव