ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर; २७ जागांवर उमेदवार निश्चित

author img

By

Published : Oct 7, 2020, 8:25 AM IST

या यादीत आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह आणि माजी खासदार हरी मांझी यांचाही समावेश आहे. या दोघांना अनुक्रमे जामुई आणि बोधगया या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे. तिने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

BJP releases first list for Bihar polls
बिहार विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर; २७ जागांवर उमेदवार निश्चित

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ७१ जागांवर मतदान पार पडणार आहे. यांपैकी २७ जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. यापूर्वी एनडीएने आपले जागावाटप जाहीर केले होते. त्यामध्ये भाजप १२१ जागांवर, तर जदयू १२२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

या यादीत आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह आणि माजी खासदार हरी मांझी यांचाही समावेश आहे. या दोघांना अनुक्रमे जामुई आणि बोधगया या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे. तिने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

या यादीमध्ये नितीश कुमार सरकारमधील तीन मंत्र्यांचा समावेश आहे. प्रेम कुमार, राम नारायम मंडल आणि विजय कुमार सिन्हा अशी या तीन मंत्र्यांची नावे आहेत. तसेच, बक्सर जिल्ह्यातील शाहपूर मतदारसंघातून भाजपने मुन्नी देवी यांना तिकीट दिले आहे. या जागेवरुन नुकतेच जदयूमध्ये प्रवेश केलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे उभे राहतील अशा चर्चा होत्या, मात्र भाजपने या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.

माजी मंत्री प्रताप सिंह यांना भाजपच्या यादीत स्थान मिळाले आहे. ते आपल्या बरहारा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. २०१५ साली सिंह यांना डावलून राजदने त्याच मतदारसंघातून सरोज यादव यांना तिकीट दिले होते, ज्यांनी सिंह यांचा पराभव केला होता.

हेही वाचा : मध्य प्रदेश पोटनिवडणूक : कमलनाथ यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.