नवी दिल्ली - काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. देशामध्ये होणारे दहशतवादी हल्ले पाकिस्तान प्रणीत असतात की नाही. हे काँग्रेसने स्पष्ट करावे. त्यानंतर पित्रोदा यांनी सांगावे की पाकिस्तान यात दोषी आहे किंवा नाही, असे प्रश्न अमित शाह यांनी दागले आहेत. त्यांच्या प्रश्नानंतर राजकारण तापण्याची शक्यता तयार झाली आहे.
शुक्रवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि घोषणा पत्र समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज भाजपने विशेष पत्रकार परिषद घेऊन यावर उलट काँग्रेसलाच प्रश्न विचारले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
Intro:Body:
आजपासून रंगणार IPLच्या बाराव्या मोसमाचा थरार; चेन्नई-बंगळुरु आमने-सामने
कोहली-डीव्हिलियर्स या दिग्गजांना लवकर बाद करण्याची कामगिरी चेन्नईच्या गोलंदाजांना पार पाडावी लागेल
चेन्नई - आयपीएलच्या १२ व्या मोसमाचा थरार आजपासून रंगणार आहे. सलामीचा सामना हा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर आज रात्री ८ वाजता या हायहोल्टेज सामन्यास सुरुवात होईल.
आरसीबीच्या गोलंदाजीची जबाबदारी ही उमेश यादव, युजवेंद्र चहल, टिम साऊदी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर असेल. बंगळुरूच्या या गोलंदाजांसोमर चेन्नईच्या एम. एस. धोनी, केदार जाधव, अंबाती रायडू, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना यांसारख्या स्फोटक फलंदाजांना थोपवण्याचे आव्हान असणार आहे.
कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, शिमरॉन हेटमायर या धाकड फलंदाजांवर आरसीबीची मदार असणार आहे. खासकरून कोहली-डीव्हिलियर्स या दिग्गजांना लवकर बाद करण्याची कामगिरी चेन्नईच्या गोलंदाजांना पार पाडावी लागणार आहे. विराटसेनेवर विजय मिळवायचा असल्यास अष्टपैलु ड्वेन ब्राव्हो, फिरकिपटू इम्रान ताहीर आणि हरभजन सिंग यांना चांगली कामगिरी करावी लागेल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत बंगळुरूला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. तर दुसरीकडे चेन्नईने ३ वेळा किताब आपल्या नावावर केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेव्हिड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ
विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुन्दर, पवन नेगी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत केजरोलिया, मंदीप सिंग, एबी डिव्हिलियर्स, नॅथन कुल्टर-नाईल, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, टिम साऊदी, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, देवदुत पड्डीकल, शिवम दुबे, हेन्रीक क्लासेन, गुरकीरत मान सिंग, हिंमत सिंग, प्रयास राय बर्मन.
Conclusion: