ETV Bharat / bharat

भाजप नेत्याची अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; व्हिडिओ व्हायरल.. - सोनाली फोगाट थप्पड व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हरियाणाच्या हिसार जिल्ह्यामधील बालसमंद गावातील आहे. "तुमच्यासारख्या लोकांना जेवढे थप्पड मारू तेवढे कमी आहेत, तुम्हाला जगण्याचा काहीही अधिकार नाही" असेही त्या या अधिकाऱ्याला म्हणताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये हा अधिकारी चक्क रडतानाही दिसून येत आहे.

bjp leader sonali phogat slaps government employee in hisar
सोनाली फोगटने अधिकाऱ्याला चपलेने फोडले; व्हिडिओ व्हायरल..
author img

By

Published : Jun 5, 2020, 9:22 PM IST

चंदीगड - हरियाणामधील भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या अधिकाऱ्याला चपलेने मारताना दिसून येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हरियाणाच्या हिसार जिल्ह्यामधील बालसमंद गावातील आहे. हे गाव म्हणजे हिसार मार्केट कमीटीचे पर्चेस पॉईंट आहे. याठिकाणी पर्चेसिंगचे काम सुरू असतानाच सोनाली फोगाट तिथे पोहोचल्या, आणि या अधिकाऱ्यासोबत त्यांचा वाद झाला.

सोनाली फोगटने अधिकाऱ्याला चपलेने फोडले; व्हिडिओ व्हायरल..

यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. "तुमच्यासारख्या लोकांना जेवढे थप्पड मारू तेवढे कमी आहेत, तुम्हाला जगण्याचा काहीही अधिकार नाही" असेही त्या या अधिकाऱ्याला म्हणताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये हा अधिकारी चक्क रडतानाही दिसून येत आहे.

गैरवर्तन केल्याचा फोगट यांचा आरोप..

सोनाली फोगाट यांना या घटनेबाबत विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की माझ्याजागी कोणतीही महिला असती तरी तिने हेच केले असते. केवळ आपल्याबाबतच नाही, तर दुसऱ्या एक महिला मंत्री कमलेश ढांडा यांच्याबाबतही या अधिकाऱ्याने आपत्तीजनक टिप्पणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोनाली फोगट यांचे स्पष्टीकरण..

"या अधिकाऱ्याशी माझे वैयक्तिक काहीही वैर नाही, मात्र त्याने जे काही म्हटले ते मला सहन झाले नाही त्यामुळे मी असा पवित्रा घेतला"; असे स्पष्टीकरण फोगाट यांनी दिले आहे.

हेही वाचा : 'हत्तीण प्रकरणावरून केरळची प्रतिमा मलीन करण्यासाठी तिरस्काराचं अभियान चालवंल जातंय'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.