ETV Bharat / bharat

'काँग्रेसचं सरकार पाडण्यात भाजपला रस नाही' - भाजप मध्यप्रदेश

'काँग्रेसचे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही. त्यांच्या पक्षामधील तो अंतर्गत प्रश्न आहे, असे विधान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान
author img

By

Published : Mar 10, 2020, 10:25 AM IST

भोपाळ - 'काँग्रेसचे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही. तो त्यांच्या पक्षामधील तो अंतर्गत विषय आहे', असे विधान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. मध्यप्रदेशात भाजप 'ऑपरेश लोटस' राबवत असल्याचे आरोप होत असतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.

  • Shivraj Singh Chouhan, former #MadhyaPradesh CM: This is Congress' internal matter and I would not like to comment on it. We had said on the first day that we are not interested in bringing down the government. pic.twitter.com/zZUjU2Qc2V

    — ANI (@ANI) March 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक असलेल्या काही आमदारांचे फोन बंद लागत असून, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. तर त्याव्यतिरिक्त आणखी १७ आमदार बेपत्ता झाले आहेत. या सर्व आमदारांना शेवटचे बंगळुरू विमानतळावर पाहण्यात आले होते. त्यामुळे जोतिरादित्य सिंधिया यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्यप्रदेशचे सत्ता नाट्य हरियाणमध्येही पाहायला मिळाले होते. काही काँग्रेसचे आमदार हरियाणातील हॉटेलमध्ये पहायला मिळाले होते. भाजप सत्ता स्थापनेचा कुटील डाव रचत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. सर्व मंत्र्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला असून, पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घरी सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

"मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. भाजपने राज्यात तयार केलेल्या या परिस्थितीला लढा देण्यासाठी नवीन मंत्रीमंडळ स्थापन करण्याची मागणी आम्ही त्यांना केली आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्ण पाच वर्षे ते टिकणार आहे." अशी माहिती काँग्रेस नेते पी. सी. शर्मा यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.