नवी दिल्ली - भोपाळ येथील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे याला देशभक्त असे संबोधले होते. या प्रकरणावरुन भाजपने हात झटकले आहेत. तर भाजप खून्याचे समर्थन करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पक्ष प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण मागणार आहे. या वक्तव्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागायला हवी असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रवक्ते आर. सुरजेवाला यांनी भाजपवर आरोप केल, की देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्याला भाजप देशभक्त, राष्ट्रवादी असल्याचे सांगत आहे. हेमंत करकरे सारखे ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले त्यांना देशद्रोही ठरवत असल्याचे सुरजेवाला म्हणाले.