लखनऊ - एखादे सरकारी कागदपत्र काढायचे असेल तर त्यासाठी किती मनस्ताप सहन करावा लागतो, याचा अनुभव सगळ्यांनाच कधीनाकधी आला असेल. त्यात आधार कार्ड हे असं ओळखपत्र आहे, त्याच्याशिवाय एकही काम होत नाही. त्यात जर काही चुक असेल तर मग सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. उत्तर प्रदेशातील मात्र, अख्या गावातील नागरिकांच्या आधार कार्डात एक चुक झाली आहे आणि तीही सारखीच. गावातील सुमारे ८० टक्के लोकांच्या कार्डवर १ जानेवारी हा जन्मदिवस छापून आलाय.
एजंटने केला घोळ -
काही कुटुंबातील १० सदस्यांच्याही आधार कार्डवर जन्मदिवस १ जानेवारी आहे. हा भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. प्रयागराज ( पुर्वीचे अलाहाबाद) जिल्ह्यातील घुरपूर क्षेत्रातील भडीलवा गावातील ही घटना आहे. या घोटाळ्यामागे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, एजंटद्वारे अनेक नागरिकांनी आधार कार्ड तयार केले. त्याने प्रत्येकाची जन्मतारीख अंदाजे १ जानेवारी टाकल्याने हा घोळ झाल्याचे बोलेल जाते. चुकीची जन्मतारीख बदलण्यासाठी आता या गावातील लोकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.