ETV Bharat / bharat

या लहानशा गावातील तिरंदाजांनी रोवलाय अटकेपार झेंडा, एकदा बघाच...

आदिवासी भागातील एका लहानशा गावातील ही शहरापासून ५ किलोमीटरवर असलेल्या स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये किंवा शेतशिवारातील मोकळ्या जागेत सराव करतात. याच गावातील कांता कटाराने १९९७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले होते. अभिषेक ननोमा या तिरंदाजाने ४ सुवर्णपदक जिंकलेत. तर, मनीषा ननोमा हिने राष्ट्रीय स्तरावर १ सुवर्णपदकासह राज्यस्तरीय ४ सुवर्णपदक जिंकले आहेत.

या लहानशा गावातील तिरंदाजांनी रोवलाय अटकेपार झेंडा

author img

By

Published : Oct 1, 2020, 6:08 AM IST

डूंगरपुर (राजस्थान) - आदिवासीबहुल असलेल्या डूंगरपूर जिल्ह्यातील बिलडी या गावाची धनुर्धरांचे गाव म्हणून ओळख आहे. या गावात १ आंतरराष्ट्रीय, ३० राष्ट्रीय आणि २० हुन जास्त राज्यस्तरीय स्पर्धेत पदकप्राप्त करणारे तिरंदाज आहेत. मुलांसोबतच मुलींनीही या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. येथील मुलांना आंतरराष्ट्रीय तिरंदाज आणि भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक राहिलेल्या जयंतीलाल ननोमा यांनी प्रशिक्षण दिले.

या लहानशा गावातील तिरंदाजांनी रोवलाय अटकेपार झेंडा

आदिवासी भागातील एका लहानशा गावातील ही शहरापासून ५ किलोमीटरवर असलेल्या स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये किंवा शेतशिवारातील मोकळ्या जागेत सराव करतात. याच गावातील कांता कटाराने १९९७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले होते. अभिषेक ननोमा या तिरंदाजाने ४ सुवर्णपदक जिंकलेत. तर, मनीषा ननोमा हिने राष्ट्रीय स्तरावर १ सुवर्णपदकासह राज्यस्तरीय ४ सुवर्णपदक जिंकले आहेत. यातल्या कित्येकांनी मजुरी करून तर कोणी शिष्यवृत्तीचे पैसे गोळा करुन धनुष विकत घेतले. जयंतीलाल यांनीही उधारीवर धनुष घेतलं आणि त्याच जोरावर जागतिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.

जयंतीलाल यांनीही 1995मध्ये तिरंदाजीला सुरुवात केली. सन 2006 मध्ये त्यांनी देशासाठी पहिले पदक जिंकले. त्यानंतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी ४ एशियन ग्रँड पिक्स स्पर्धेत सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १० पेक्षा आणि राष्ट्रीय स्पर्धेत ३० पेक्षा जास्त पदकं जिंकली. तिरंदाजीबाबत जयंतीलाल ननोमा यांचे योगदान खूप मोठ होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदक जिंकण्यापासून तीनदा भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यापर्यंतची मोठी कामगिरी त्यांनी चोखपणे बजावली. त्यांना देशाचं नाव करणाऱ्या तिरंदाजांची टीम तयार करायची होती. मात्र, एका दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे स्वप्न अर्धवटच राहिले.

आंतरराष्ट्रीय तिरंदाज आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले जयंतीलाल नानोमा आता आपल्यासोबत नाहीत. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगलेले त्यांचे विद्यार्थी आजही शक्य तितकी मेहनत घेत आहेत. डूंगरपूर तसेच आदिवासी क्षेत्रातील हुशार तिरंदाजांना चांगले धनुर्विद्या शिकविण्यासाठी त्यांनी नेहमीच तिरंदाजीची अकॅ़मी उघडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सरकारकडून क्रीडा परिषदेकडे आग्रह धरला. परंतु आता ते नसल्याने त्यांचे विद्यार्थी त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी डूंगरपुरात एक आर्चरी अ‍कॅडमी सुरू करण्याची मागणी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.