ETV Bharat / bharat

'बिहार निवडणुकीतील विजयाचा कोविड, अर्थव्यवस्थेशी संबंध नाही'

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार विजयी झाले आहे. मात्र, मोदींनी हा विजय कोरोना महामारीचे यशस्वी व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केल्यावरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सिताराम येचुरी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

author img

By

Published : Nov 12, 2020, 10:39 PM IST

सिताराम येचुरी
सिताराम येचुरी

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) सरकार विजयी झाले आहे. मात्र, मोदींनी हा विजय कोरोना महामारीचे यशस्वी व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केल्यावरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सिताराम येचुरी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त ०.०३ टक्के मते जास्त मिळाली असल्याते ते म्हणाले.

एनडीएला फक्त ०.०३ टक्के मते जास्त

नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीआय, सीपीआयएम आणि सीपीआय (एमएल) पक्षाला २९ जागांपैकी १६ जागावर विजय मिळवता आला. 'पंतप्रधान मोदींनी अविचारीपणातून बिहार निवडणुकीतील विजयाची श्रेय कोरोनाचे आणि अर्थव्यवस्थेच्या यशस्वी व्यवस्थापनास दिले आहे. मात्र, मतांचा विचार करता, एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त ०.०३ टक्के जास्त मते मिळाल्याचे येचुरी म्हणाले. त्यामुळे भाजपाचा हा विजय कोरोना व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्थेच्या यशाचा अजिबात नाही, असे येचुरी म्हणाले.

काय म्हणाले होते मोदी ?

भाजप मुख्यालयात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कोरोना काळातही सरकारने नागरिकांसाठी अनेक काम केले. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटात सापडले असताना भारताने यशस्वीपणे हे संकट हाताळल्याचे मोदी म्हणाले होते. यावर येचुरी यांनी आक्षेप घेतला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून अटीतटीच्या लढतीत एनडीएला बहुमत मिळाले. एनडीएने १२५ जागा जिंकल्या तर महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. फक्त १२ जागांवरून महागठबंधन सत्तेपासून दूर राहिली. एनडीएमध्ये जेडीयूला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या. त्यामुळे नितीश कुमार यांची क्रेझ कमी झाल्याचे निकालातून स्पष्ट दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.