ETV Bharat / bharat

नितीश म्हणाले... तर तेजस्वी यांना मुख्यमंत्री बनवू - राबडी देवी

author img

By

Published : Apr 13, 2019, 3:09 PM IST

'रालोआकडून नितीश यांना योग्य संधी मिळत नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडूनही. ते भाजपच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे ते आरजेडीशी पुन्हा आघाडी करू इच्छितात,' असे माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी सांगितले.

राबडी देवी

पाटणा - राबडीदेवी यांनी शनिवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 'नितीश कुमार म्हणाले की, त्यांना महाआघाडीने आताच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावे. त्या बदल्यात २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करू, असे ते म्हणाले,' असा दावा राबडी देवी यांनी केला आहे.

राबडी देवी

'रालोआकडून नितीश यांना योग्य संधी मिळत नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडूनही. ते भाजपच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे ते आरजेडीशी पुन्हा आघाडी करू इच्छितात. प्रशांत किशोर त्यांच्या या म्हणण्याविषयी विचारणा करण्यासाठी किमान ५ वेळा येऊन गेले. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना २०२० मध्ये मुख्यमंत्री बनवू असे सांगितले. त्याबदल्यात त्यांना महाआघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी केली आहे,' असे माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी सांगितले.

'लालूप्रसाद येथे नाहीत. मात्र, महाआघाडीला ४०० जागा मिळतील. लालूजी का तुरुंगात आहेत. त्यांना लालूजींविरोधात कोणताही पुरावा सापडला नाही. मंजू वर्मा यांच्याविरोधात अनेक पुरावे सापडले. त्या मात्र, खुलेआम तुरुंगाबाहेर आहेत. लालूंविरोधात पुरावेच सापडले नाहीत. ते चारा घोटाळ्यात नव्हतेच. त्यांनी गरीब लोकांसाठी काम केले. मात्र, त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांना घोटाळ्यासाठी दोष दिला जात आहे,' असे त्या म्हणाल्या.

तेजस्वी यांनीही नितीश कुमार यांची महाआघाडीत येण्याची इच्छा प्रदर्शित केली असल्याचे सांगितले. 'नितीश यांनी समोर यावे. त्यांना अशा प्रकारची इच्छा व्यक्त करावीशी का वाटली, ते त्यांनी सांगावे. त्यांना मागील ६ महिन्यांपासून पुन्हा महाआघाडीत का यावेसे वाटते, ते त्यांनी सांगावे,' असे त्यांनी म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.