ETV Bharat / bharat

जंगल राजमध्ये बिहारचा विकास होणार नाही, मोदींचा महागठबंधनवर हल्लाबोल

author img

By

Published : Oct 23, 2020, 5:31 PM IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार बिहारी जनतेने केला आहे, असं वक्तव्य आज पंतप्रधान मोदींनी केले. मोदींनी याआधी सासाराम आणि गया येथे सभा घेतल्या. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी राज्यात १२ सभा घेणार आहेत.

PM Modi
पंतप्रधान मोदी

पाटणा (भागलपूर) - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार बिहारी जनतेने केला आहे, असे वक्तव्य आज पंतप्रधान मोदींनी केले. ते राज्यातील भागलपूर येथे सभेला संबोधित करत होते. जंगलराजमध्ये बिहारचा विकास होणार नाही, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आज बिहारमधील तीन जिल्ह्यात जाहीर सभा घेत महागठबंधनवर हल्लाबोल केला.

'ही माझी आज तिसरी सभा आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मी जिथे गेलो तिथे एनडीएलाच पाठिंबा असल्याचे मला दिसत आहे. बिहारच्या विकासाचा वेग आणखी वाढण्यासाठी एनडीएला निवडून देण्याचा निर्धार बिहारी जनतेने केला आहे', असे मोदी म्हणाले.

जंगलराजमध्ये विकास होणार नाही

मोदींनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. राज्याला लुटण्याशिवाय विरोधकांनी दुसरे काहीही केले नाही, असा टोला मोदींनी राजदला लावला. 'गोरगरिबांसाठी त्यांनी काहीही केले नाही. बिहारमध्ये लोकशाहीची बिजे पहिल्यांदा रोवली गेली. राज्याचा विकास आणि लोकशाही जंगलराजमध्ये वाढेल का? बिहारला भ्रष्टाचारविरहीत सरकार पाहिजे, असे मोदी म्हणाले. मोदींनी याआधी सासाराम आणि गया राज्यात सभा घेतल्या. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी राज्यात १२ सभा घेणार आहेत.

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत, राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.