ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : तेजस्वी यादवांवर भर सभेत भिरकावली चप्पल - तेजस्वी यादव चप्पल हल्ला

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. तेजस्वी यांच्यावर फेकलेली पहिली चप्पल त्यांच्या बाजूने निघून गेली, तर दुसरी थेट त्यांच्या अंगावर जाऊन पडल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यानंतर सभेत काही काळ गदारोळ झाला.

Tejashwi yadav slippers
बिहार विधनासभा निवडणूक : तेजस्वी यादवांवर भर सभेत भिरकावल्या चपला
author img

By

Published : Oct 21, 2020, 7:00 AM IST

Updated : Oct 21, 2020, 7:40 AM IST

पाटणा : राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर सभेत चप्पल फेकण्यात आल्याची घटना घडली. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील बभंडीमध्ये हा प्रकार घडला. एका दिव्यांग युवकाने आपल्या चप्पला यादवांवर भिरकावल्या होत्या.

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. तेजस्वी यांच्यावर फेकलेली पहिली चप्पल त्यांच्या बाजूने निघून गेली, तर दुसरी थेट त्यांच्या अंगावर जाऊन पडल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यानंतर सभेत काही काळ गदारोळ झाला. लोकांनी आणि पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्या दिव्यांग तरुणाला सभेपासून दूर नेले.

बिहार विधनासभा निवडणूक : तेजस्वी यादवांवर भर सभेत भिरकावल्या चपला

तेजस्वी यांनी दिले नाही महत्त्व..

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी या घटनेकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये याबाबतचा उल्लेखही करणे टाळले. तर, राजदचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी मात्र या घटनेचा निषेध केला. काँग्रेस नेते राजेश राम हे कुतुंबा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव आले होते.

बिहारमध्ये २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. तर, १० नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.

हेही वाचा : 'भैया तेजस्वी हमार हमनी के प्यारा लागेलन, सुख-दुःख में जनता के साथ सबसे आगे चलेलन..'; आरजेडीचे गाणे लाँच

Last Updated : Oct 21, 2020, 7:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.