पटना - कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या डॉक्टरांवरच नागरिक हल्ला करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी दिली आहे.
बिहार येथे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्कतेने नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. मात्र, त्यांच्यावरच हल्ला होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा हल्लेखोरांविरोधात स्पीटी ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. गरज भासल्यास कडक नियम लागू करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले, की औरंगाबाद प्रकरणातील २४ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याविरोधात कडक कारवाई देखील करण्यात येईल.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे १९ जिल्ह्यांना खबरदारी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संपूर्ण देश कोरोना विषाणूने त्रस्त आहे. दरम्यान, या विषाणूमुळे बिहारमधील लोकांची चिंता वाढली आहे. पाटण्यातील डीएम यांनी १९ जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी नालंदा मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचा संदर्भ देऊन दिल्ली ते पटनापर्यंतच्या फ्लाईटचे तपशील पाठवले आहे. याच फ्लाईटने २२ मार्च रोजी प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली होती. या प्रवाशाने पटनापर्यंत प्रवास केला होता. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्याचे निर्देशही डीएमने दिले आहेत.
अशा परिस्थितीत जर पोलीस, डॉक्टर यांच्यावर हल्ले झाले, तर, कोरोनाविरोधातील ही लढाई कशी जिंकता येईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नीतीश कुमारचा जिल्हा बनला कोरोनाचा हॉटस्पॉट -
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा जिल्हा कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे हॉटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यात नागरिकांना क्वारंटाईन होण्यास सांगण्यात येत आहे.