पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जाणारा ईव्हीएम मशीन्सच्या गैरवापराचा संशय बोगस असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दिल्ली येथील बैठकीसाठी निघताना ईव्हीएमशी संबंधित गैरप्रकारांविषयी प्रतिक्रिया दिली.
'ईव्हीएम मशीन्समुळे मतदान पद्धतीत पारदर्शकता आली आहे. विरोधक पक्ष राजकीय पराजयाचा सामना करावा लागणार असल्यानेच ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत. मोदी सरकार येण्याच्या खूप आधीपासून ईव्हीएमचा वापर सुरू झाला आहे. मी नेहमीच तंत्रज्ञान वापरण्याच्या बाजूने राहिलो आहे. यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे,' असे नितीश कुमार म्हणाले.