भोपाळ - देशभरात आज दसऱ्याचा उत्साह पसरला आहे. ठिकठिकाणी सायंकाळी होणाऱ्या रावण दहनाची तयारी होत आली आहे. या उत्साहावर पावसामुळे पाणी फिरू नये, म्हणून भोपाळमध्ये चक्क 'वॉटरप्रूफ' रावण पुतळे उभारण्यात आले आहेत.
यासोबतच, स्थानिकांनी रावणाचा सर्वात लहान मुलगा अक्षयकुमार याचादेखील पुतळा दहनासाठी उभारला आहे. मुलांना रामायणातील त्याची भूमिका कळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे एका स्थानिकाने सांगितले.
गेल्या २८ वर्षांपासून आम्ही या गावात रावणदहन साजरा करत आहोत. यावर्षी पुतळे बनवताना आम्ही जिलेटीनचा वापर करत पुतळ्यांना वॉटरप्रूफ केले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा या पुतळ्यांवर काहीही परिणाम झालेला नाही, अशी माहिती पुष्पेंद्र सिंह यांनी दिली.
भोपाळसह मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही रामलीला मंडळांनी आपले रावणदहन उत्सव रद्द केले आहेत.
हेही वाचा : द्वारका येथील दसरा उत्सवात सहभागी होणार पंतप्रधान मोदी, सुरक्षेचा कडक बंदोबस्त