ETV Bharat / bharat

भिवंडी इमारत दुर्घटना : राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदींनी केले दुःख व्यक्त

भिवंडी धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंडमधील जिलानी नामक ३ मजली इमारतीचा अर्धा भाग सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला. या इमारतीत एकूण ५४ सदनिका होत्या, यापैकी 21 सदनिका पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आणि यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर ७ गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.

bhiwandi building collapse: President Kovind, PM Modi extend condolences to victims families
ठाणे इमारत दुर्घटना : राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदींनी केले दुःख व्यक्त
author img

By

Published : Sep 21, 2020, 11:04 AM IST

Updated : Sep 21, 2020, 11:17 AM IST

नवी दिल्ली - भिवंडी धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंडमधील जिलानी नामक ३ मजली इमारतीचा अर्धा भाग सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला. यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर ७ गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.

भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेत जी जीवितहानी झाली ती वेदनादायी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना केली आहे.

  • The loss of lives in the building collapse incident at Bhiwandi, Maharashtra is quite distressing. In this hour of grief, my thoughts & prayers are with victims. I wish speedy recovery of injured. Local authorities coordinating rescue & relief efforts: President Ram Nath Kovind pic.twitter.com/LS8D9aTjry

    — ANI (@ANI) September 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत त्यातील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे ट्विट केले आहे. जखमी झालेले लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी पीडितांसाठी सर्व मदत केली जात असल्याचे म्हटलं आहे.

  • Saddened by the building collapse in Bhiwandi, Maharashtra. Condolences to the bereaved families. Praying for a quick recovery of those injured. Rescue operations are underway and all possible assistance is being provided to the affected.

    — Narendra Modi (@narendramodi) September 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, जिलानी इमारतीत एकूण ५४ सदनिका होत्या, यापैकी २१ सदनिका पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आणि यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर ७ गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. मृतांमध्ये ५ लहान बालकांचा समावेश आहे.

हेही वाचा - भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; पालकमंत्र्यांची घोषणा

हेही वाचा - भिवंडी इमारत दुर्घटना : सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचे मस्जिदमधून आवाहन

Last Updated : Sep 21, 2020, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.