ETV Bharat / bharat

मोदींसमोर तुल्यबळ उमेदवार; चंद्रशेखर आझादांना मिळणार वंचितांचा पाठिंबा

भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांनी मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर एकतर्फी होणारी लढत आता 'कांटे की टक्कर'मध्ये परिवर्तीत झाली आहे.

author img

By

Published : Mar 29, 2019, 1:21 AM IST

पंतप्रधान मोदी आणि भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद (संपादित छायाचित्र)

लखनौ - लोकसभा निवडणुकांना केवळ २ आठवडे शिल्लक आहेत. त्याबरोबरच निवडणुकांचा रोमांच वाढत चालला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कोण उभे असणार याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांनी मोदींच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर एकतर्फी होणारी लढत आता 'कांटे की टक्कर'मध्ये परिवर्तीत झाली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघावर लागलेले आहे. पंतप्रधान मोदी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. या मतदार संघातून त्यांना सहसा मोठे चॅलेंज मिळणार नाही, असे म्हटले जात होते. त्यामुळे ही लढत एकतर्फी होणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र, आता या ठिकाणावरून भीम आर्मी चिफ चंद्रशेखर आझाद लढणार आहेत.

चंद्रशेखर आझाद ३० मार्चला वाराणसी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील त्यांचे कार्यकर्ते तयारीत लागले आहेत. चंद्रशेखर येथून निवडणूक लढवणार, असे पश्चिम उत्तर प्रदेशच्या भीम आर्मीच्या प्रभारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोदींसाठी आता करो-या-मरोची स्थिती तयार झाली आहे.

चंद्रशेखर आझाद यांना सहारनपूर दंगा प्रकरणात रासुका अंतर्गत तुरुंगवास भोगावा लागला होता. उत्तर प्रदेशात त्यांनी भीम आर्मी या संघटनेच्या नावाखाली वंचितांचा मोठा जनसमुदाय आकर्षित केलेला आहे. वाराणसीमध्येही त्यांना मोठ्या प्रमाणात वंचितांचा पाठिंबा मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे मोदींवर मोठी मेहनत करण्याची वेळ आली आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.